Nashik News : NMC उत्पन्नाची तूट तब्बल सव्वाचारशे कोटींवर; चालू आर्थिक वर्षाचे अंदाज कोलमडले

NMC News
NMC News esakal
Updated on

नाशिक : महापालिका प्रशासनाने यंदाच्या आर्थिक वर्षात जमेच्या धरलेल्या बाजू कमकुवत ठरल्याने तब्बल सव्वाचारशे कोटी रुपयांची उत्पन्नात तूट आली आहे. त्यामुळे आता सुधारित अंदाजपत्रक सादर करताना विविध विभागांच्या खर्चांना कात्री लावण्याच्या सूचना लेखा विभागाने दिले आहे. (NMC Income Deficit At Four Hundred Crores Estimates for current financial year collapsed Nashik News)

२०२२ व २३ या आर्थिक वर्षासाठी महापालिका प्रशासनाने २२७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. अंदाजपत्रकात उत्पन्नाची बाजू ग्राह्य धरताना सर्वाधिक उत्पन्न जीएसटीच्या माध्यमातून मिळणार होते. त्यानुसार राज्य शासनाकडून नियमित मासिक हप्ता महापालिकेला प्राप्त झाला. हीच काय उत्पन्नाच्या दृष्टीने सकारात्मक बाब म्हणता येईल.

त्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर सोर्स पूर्णपणे कोलमडले आहे. १२ मिळकती विकसित करून त्यातून जवळपास २०० कोटी रुपये प्राप्त होतील, असा अंदाज होता मात्र हा बीओटी प्रकल्प रद्द झाला. नगररचना विभागातून जवळपास २५० कोटी रुपये मिळतील, असा अंदाज होता.

मात्र बांधकामाच्या ऑनलाइन परवानग्यामुळे हा अंदाजही फसला. घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातूनदेखील उद्दिष्ट गाठता येणे अद्यापही शक्य दिसत नाही. विविध करांच्या माध्यमातूनदेखील फारसे उत्पन्न मिळत नाही.

नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी चालू आर्थिक वर्षाच्या जमा व खर्चाचा आढावा घेत असताना विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जवळपास सव्वाचारशे कोटी रुपयांची तूट दिसून आली आहे.

त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक पूर्णपणे कोलमडले असून, यात सुधारणा करण्यास अजिबात वाव नाही. त्यामुळे बांधकामसह महत्त्वाच्या विभागांना त्यांच्या विकासकामांच्या खर्चाला कात्री लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

NMC News
Nashik News : ‘आरोग्य’च्या भरती प्रक्रियेत डमी, बोगस उमेदवार नाही!

असा आहे जमेचा गोषवारा

मालमत्ता कराच्या माध्यमातून १५१ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात ८० कोटी रुपये प्राप्त झाले. नगररचना विभागाकडून ३०२ कोटी रुपये अपेक्षित होते, मात्र आत्तापर्यंत १३५ कोटी रुपये प्राप्त झाले.

पाणीपट्टीचे उद्दिष्ट ७५ कोटी रुपये होते. त्यापैकी आतापर्यंत फक्त ४१ कोटी रुपये प्राप्त झाले. मिळकत विभागाकडून २०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना २५ कोटी रुपये प्राप्त झाले. घरपट्टीचे १८९ कोटी रुपयांची उद्दिष्ट होते.

त्यापैकी आतापर्यंत ८० कोटी रुपये जमा झाले. जमेच्या एकत्रित बाजूंचा अंदाज घेता जवळपास ४५० कोटी रुपयांची तूट दिसून येत आहे. त्यामुळे आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना लेखा विभागाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

NMC News
Winter Weather : थंडीचा तडाखा कायम; नाशिकचे किमान तापमान 9 अंशांवर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()