Nashik Corona Update : कोरोना पार्श्वभूमीवर NMCने वाढविल्या चाचण्या!

Nashik Corona Update
Nashik Corona Updateesakal
Updated on

नाशिक : चीनमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या नव्या व्हेरिएंटने टकटक करण्यास सुरवात केल्याने त्या पार्श्वभूमीवर महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कुठल्याही प्रकारच्या आजाराची तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर केंद्र शासनाकडून अद्याप सूचना नसल्या तरी परदेशातून येणाऱ्या नागरिकांकडे महापालिकेच्या पथकाने लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी अर्थात मास्क बंधनकारक करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. (NMC increased seats in background of Corona Nashik Corona Update news)

कोरोना नियमावली संदर्भात केंद्र शासनाकडून अद्याप सूचना प्राप्त झाल्या नाही. मात्र, चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ८० टक्के नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारमार्फत उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, केंद्राकडून सूचना नसल्या तरी महापालिकेच्या माध्यमातून मात्र उपाययोजनांची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची चाचणी घेतली जाणार आहे.

अन्य केंद्रांवर चाचण्या वाढविल्या जाणार आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या जिनोम सिक्वेन्स देखील केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी केंद्राच्या सूचनांची वाट पहिली जात आहे. कोरोनाकाळात महापालिकेने सर्व रुग्णालय कोविड म्हणून घोषित केली होती. रुग्णांची संख्या झपाट्याने घटल्यानंतर नियमित तपासणी सुरू झाली. आता मात्र केंद्र सरकारकडून सूचना आल्यास पुन्हा रुग्णालय राखून ठेवले जाणार आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Nashik Corona Update
Nashik News : नाशिकच्या युवकांचा Revamp Motoचा स्टार्टअप! नितीन गडकरींच्या हस्ते अनावरण

घाबरण्याची आवश्यकता नाही

नाशिक शहरामध्ये १८ ते ४४ वयोगटातील दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७६ टक्के आहे. चाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ८१ टक्के आहे. पंधरा ते अठरा वयोगटातील ५१ टक्के युवकांनी दोन डोस घेतले आहे.

बारा ते चौदा वयोगटात दोन डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ६५ टक्के आहे. शहरात २७ लाख २७ हजार २९५ डोस देण्यात आले आहे. सध्या कोरोनाचे दोनच सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहे. त्यामुळे नाशिकमध्ये घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

Nashik Corona Update
Antinarcotics Drugs Code : अंमली तस्करांविरोधात शहरात ‘ॲन्टिनार्कोटिक्स ड्रग्ज्‌ स्कॉड’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.