NMCला खासगी जागेतील अतिक्रमण काढण्यात ‘रस’! आमदारांच्या आरोपाने अतिक्रमण-नगररचना विभागाची लक्तरे वेशीवर

MLA Devyani Farande take on NMC
MLA Devyani Farande take on NMCesakal
Updated on

Nashik NMC News : महापालिकेच्या अतिक्रमण व नगररचना विभागाकडून सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे काढण्यास प्राधान्य देणे अपेक्षित असताना खासगी जागांवरील अतिक्रमणे काढले जात असल्याने महापालिका खासगी मालमत्ताधारकांसाठी काम करते की सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण काढण्यासाठी,

असा सवाल उपस्थित करताना आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी खासगी जागेवरील अतिक्रमण काढताना रेडीरेकनरच्या दहा टक्के रक्कम महापालिकेने जमा करावी, अशी मागणी केली आहे. (NMC interested in removing encroachment from private space MLA devyani farande allegation Urban Planning Department nashik news)

गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहे. परंतु अतिक्रमणे काढताना अतिक्रमण विभागाकडून चालढकल केली जात आहे. प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना देताना अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला.

त्यानंतर शहरात कारवाईला सुरवात झाली, परंतु अशा प्रकारची कारवाई होत असताना खासगी जागांवरील अतिक्रमणेदेखील काढली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी जागांसंदर्भात मालकांचे वाद असतात.

त्या वादात नाशिक महापालिकेने पडण्याची आवश्यकता नाही. महापालिका ही सरकारी यंत्रणा असल्याने एकाला न्याय मिळत असेल, तर दुसऱ्यावरदेखील अन्याय होत आहे.

त्यामुळे खासगी जागांवरील अतिक्रमण संदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण व नगररचना विभागाकडून घेतली जात असलेली भूमिका चुकीचे असल्याचे आमदार फरांदे यांनी सांगताना भाऊबंदकीच्या प्रकरणात महापालिकेने पडू नये असा सल्ला दिला.

खासगी जागा रिकाम्या करण्याचा ठेका नाशिक महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी घेतला आहे. नाशिक महानगरपालिकेला खासगी क्षेत्रातील अतिक्रमण काढायचे असेल तर जागामालकांकडून कमीत-कमी रेडीरेकनरच्या दहा टक्के रक्कम घेणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.

त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात तरी वाढ होईल, महापालिकेकडून खासगी क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याबाबत दिलेल्या नोटिसांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी प्रभारी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Devyani Farande take on NMC
NMC Promotion : महापालिकेच्या इतिहासातील पदोन्नत्यांचा सर्वात मोठा गैरव्यवहार? घोडे-पाटलांचे कारनामे

खासगी जागामालकांची सुपारी

गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील भाजी बाजार येथे रस्त्यावर अतिक्रमण होऊन वाहतूक कोंडी होत आहे, तर मुंबई नाका येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहे.

अनेक डीपी रस्त्यांवर अतिक्रमणे असल्याने वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना मानसिक त्रास होत आहे. सदर अतिक्रमणे काढण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी तक्रार करूनही कारवाई होत नाही.

मात्र, खासगी खासगी क्षेत्रातील व ऑनलाइन आलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात असल्याने यावरून खासगी कामे घेत असल्याचा संशय आमदार फरांदे यांनी व्यक्त केला.

"शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असताना ते काढायचे सोडून खासगी जागेवरील अतिक्रमणे काढली जात असल्याने ही बाब लाजिरवाणी आहे महापालिकेने भाऊबंदकीच्या वादामध्ये पडू नये. यासंदर्भात शासनाकडे तक्रार केली जाणार आहे."

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

MLA Devyani Farande take on NMC
NMC Promotion: सफाई कर्मचारी विकास युनियननेही थोपटले दंड! नि:पक्षपणे चौकशी न झाल्यास आंदोलनाचा ईशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.