NMC Recruitment: डिसेंबरअखेर वैद्यकीय, अग्निशमनची भरती; महापालिका आयुक्तांचे निर्देश

Recruitment
Recruitment esakal
Updated on

NMC Recruitment: महापालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांची भरती डिसेंबरअखेर घेण्याच्या स्पष्ट सूचना महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या आहेत.

टीसीएस कंपनीमार्फत भरती होणार असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यात स्पष्ट सूचना दिल्या. संपूर्ण राज्यासाठी जाहिरात काढली जाणार असून, यात ३६ जिल्ह्याच्या ठिकाणी परिक्षा घेतल्या जाणार आहेत. (nmc Medical Fire Recruitment at end of December nashik news)

महापालिकेत जवळपास २८०० पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरताना महापालिकेला महसुली खर्च ३५ टक्क्यांच्या आत असणे बंधनकारक आहे. परंतु महसुली खर्च ४१ टक्क्यांपर्यंत असल्याने रिक्तपदे भरता येत नाही. परंतु कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून राज्य शासनाने वैद्यकीय व अग्निशमन विभागाला रिक्तपदे भरण्यास संमती दिली. दोन्ही विभागांची मिळून ७०६ पदे आहेत. परंतु अशा प्रकारची संमती देताना टीसीएस किंवा आयबीपीएस या संस्थेच्या मार्फतच भरतीच्या सूचना आहेत.

आयबीपीएसची क्षमता नसल्याने महापालिकेने टीसीएसकडे प्रस्ताव सादर केला होता. टीसीएसने काम करण्याची इच्छा दर्शविल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू झाली. वास्तविक गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय व अग्निशमन विभागाच्या रिक्तपदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु तांत्रिक कारणे पुढे करतं प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. टीसीएसकडूनदेखील माहितीचे संकलन करण्यातच वेळ दडविला जात आहे.

परंतु आता आयुक्त डॉ. करंजकर ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी (ता. १) आयुक्तांच्या दालनात टीसीएसच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत आयुक्तांनी स्पष्टपणे डिसेंबरअखेर वैद्यकीय व अग्निशमन दलाच्या रिक्तपदांच्या भरतीची जाहिरात काढण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता भरती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Recruitment
Fireman recruitment : फायरमन भरतीला हिरवा कंदील; स्थायी समितीची 45 प्रशिक्षणार्थींना नियुक्त करण्यास मान्यता

दोन्ही विभागांची मिळून ७०६ पदे आहेत. यातील ‘ब‘ ते ‘ड’ संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाऊ शकते. ‘अ’ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते.

त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता उर्वरित ६२४ पदामधून अग्निशमन विभागातील ३७ ड्रायव्हरची पदे वगळली जाणार असल्याने एकूण ५८७ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकर भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या बैठकीत २६ प्रकारच्या विविध पदांसाठी आवश्यक उमेदवारांचे वय, पात्रता आणि जाहिरात फॉरमॅट संदर्भात चर्चा करण्यात आली. तांत्रिक प्रकारची सर्व माहिती महापालिका प्रशासनाने टीसीएसकडे सादर केली आहे.

३६ जिल्ह्यांमध्ये परिक्षा

५८७ पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहे. जवळपास ५० हजारापर्यंत अर्ज दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात परिक्षार्थींची परिक्षा घेण्यासाठी जागा नसल्याने जिल्हा पातळीवर परिक्षा घेण्याचे नियोजन टीसीएसमार्फत केले जाणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये परिक्षा होईल.

Recruitment
AAI Recruitment : परीक्षा न देताच एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, भरती प्रक्रिया सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()