NMC News : दीड महिन्यात 2352 अनधिकृत फलक हटविले

Staff while deleting invalid panels.
Staff while deleting invalid panels.esakal
Updated on

NMC News : महापालिकेने शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे चौकाचौकात लावलेले अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम राबविली. दीड महिन्यात २३५२ अनधिकृत होर्डिंग, बॅनर, पोस्टर काढून टाकले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार, उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबविली. (NMC News 2352 unauthorized boards removed in one half months nashik news)

दीड महिन्यात मनपाचे सहा विभाग मिळून एकूण २, ३५२ फलक हटविण्यात आले आहेत. त्यात जाहिरात बोर्ड, होर्डिंग, पोल बॅनर, झेंडे, पोस्टर्स, स्टॅन्ड बोर्डाचा समावेश आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक ८४५ अनधिकृत फलक सातपूर विभागात, तर नाशिक पश्चिममध्ये सर्वात कमी ४७ फलक हटविले.

१ एप्रिल ते १६ एप्रिल या पंधरवड्यात ५२१ अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिक पूर्वमध्ये सर्वाधिक १२० फलक, तर नाशिक पश्चिम विभागात कमी ३६ फलक हटविण्यात आले आहेत. १ ते ३१ मार्च दरम्यान सहा विभागात १, ८३१अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत. तर एप्रिल महिन्यात शहरात ५२१ फलक काढण्यात आले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Staff while deleting invalid panels.
Nashik News : पोषण आहार अनुदानाच्या वाटपात घोळ; प्राथमिक शिक्षक संघाचे नांदगावला बेमुदत उपोषण

विभागनिहाय कारवाई

विभाग मार्च एप्रिल

नाशिक पूर्व – ९० १२०

नाशिक पश्चिम – ४७ ३६

नाशिक रोड – ५५२ ९५

सिडको - ९१ ८६

पंचवटी – २०६ ६८

सातपूर – ८४५ ११६

एकूण – १,८३१ ५२१

Staff while deleting invalid panels.
Ramzan Eid 2023 : ईदगाह मैदानावरील कामांना वेग; महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.