नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेने पुढील पाच वर्षात ४१०० वैयक्तिक शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यापैकी ३१४ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान वैयक्तिक शौचालयाचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिकेचे अतिरिक्त काम या निमित्ताने टळले आहे. (NMC News Aim to set up 4100 individual toilets in 5 years nashik news)
केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय उभारण्याचीदेखील मोहीम राबवली जाते. पुढील पाच वर्षासाठी नाशिक महापालिकेला चार हजार १०० वैयक्तिक शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
त्या अंतर्गत शहरात स्वच्छता निरीक्षकांनी आतापर्यंत ३१४ लाभार्थ्यांचा शोध घेतला. तर, २३५ लाभार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेताना अंतिम यादी निश्चित केली आहे.
केंद्र सरकारने शहरी भागातील दुर्लक्षित व गोरगरीब नागरिकांचे जीवनमान उंचवावे महिलांना रात्री बाहेर शौचास जावे लागू नये व सार्वजनिक सौचालयाचा वापर कमी व्हावा या उद्देशाने वैयक्तिक शौचालय बांधण्या साठी अनुदान देण्याची योजना राबविली आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
वैयक्तिक शौचालयासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. नाशिक महापालिकेने २०१५-१६ पासून आतापर्यंत ७,५४२ वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी अनुदान वाटप केले. मात्र, आता शासनाने बारा हजार रुपये अनुदान थेट बँक खात्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे.
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी पहिला हप्ता सहा हजार रुपयांचा, तर शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सहा हजार रुपयांचा दुसरा हप्ता अदा केला जाईल, अशी माहिती घनकचरा व आरोग्य विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.