NMC News : अधिकाऱ्यांचा सुमार दर्जा ‘क्वालिटी सिटी’ च्या मुळावर! उपक्रमाची कल्पना अडचणीत

NMC News
NMC News esakal
Updated on

NMC News : कौशल्य विकास, स्वच्छता, शिक्षण या क्षेत्रांतील गुणवत्ता वाढविण्यासाठी देशातील पाच शहरात नाशिकची क्वालिटी सिटी बनविण्याच्या उपक्रमासाठी नाशिक महापालिकेची निवड झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्‌घाटनदेखील करण्यात आले. परंतु, उपक्रमात महापालिकेने हिरिरीने भाग घेऊन साहाय्य करण्याऐवजी काही अधिकाऱ्यांचा करंटेपणा समोर आला.

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया व नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांना आमचे काय, असा सवाल केल्याने अधिकाऱ्यांनी केल्याने महापालिकेच्या क्वालिटीचे बारा वाजवले. (NMC News Average status of officers barrier of nashik making Quality City idea of ​​initiative in trouble)

देशातील शहरांच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी तेथील मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया व नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे क्वालिटी सिटी उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमासाठी देशातील पाच शहरांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातून एकमेव नाशिकची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. उपक्रमांतर्गत नाशिकच्या समग्र विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

नाशिक शहरातील घरेलू कामगार, वाहनचालक, शिपाई आणि सुपरवायझर स्तरावरील व्हाइट कॉलर कर्मचारी यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात हाती घेतला जाणार आहे. स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करून आवश्यक तेथे अभ्यासक्रमांच्या दुरुस्तीसह अंमलबजावणी केले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
Trimbakeshwar Controversy: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, घेतला मोठा निर्णय

नाशिक जिल्ह्यात कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण हे चळवळीचे तीन प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. विविध घटकांचा दर्जा वाढविण्याच्या या उपक्रमात यासाठी महापालिकेसह क्रेडाई नाशिक मेट्रो, सिटीझन्स फोरम, आयमा, निमा, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स, आर्किटेक्ट ॲन्ड इंजिनिअर्स,

इंडियन मेडिकल असोसिएशन, बिल्डर्स असो ऑफ इंडिया, नरेडको, कॉम्प्युटर असोसिएशन, नाईस, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, निमा, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयसीएआय, फिक्की, महाराष्ट्र चेंबर्स, तान, निपम, नाशिक स्कूल असोसिएशन, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, केमिस्ट असोसिएशन, रिक्षा चालक संघटना,

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, नाशिक फर्स्ट, मी नाशिककर, इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, असोचेम, कॉर्पोरेटर्स, को-ऑप. बँक फेडरेशन, सामुदायिक संस्था, शासकीय व निमशासकीय विभाग, जिल्हा परिषद, आदिवासी विकास, महसूल विभाग या शहर विकासात योगदान देणाऱ्या संस्थांचा सहभाग आहे.

NMC News
Trimbakeshwar Controversy: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, घेतला मोठा निर्णय

अधिकारी म्हणतात, आमचे काय?

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्वालिटी सिटी नाशिक’ चळवळ राबविला जात आहे.

महापालिका, जिल्हा परिषद, क्रेडाई नाशिक मेट्रो, नाशिक सिटीझन्स फोरम, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात एक सामंजस्य करार केला जाणार आहे. करार करताना काही महत्त्वाची कागदपत्रे व माहिती आवश्‍यक असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता आमचे काय, असे एका अधिकाऱ्याने प्रश्न केल्याने क्वालिटी सिटी उपक्रमाची कल्पना अडचणीत आली आहे.

NMC News
NMC Water Cut : दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित पाणीकपात! शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.