NMC News : मोकळ्या भूखंडावर Double Tax! एकेरी करासाठी विशेष मोहीम

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News : शहरात जवळपास ३१ हजार १६३ भूखंड असे आहेत की त्यावर इमारत उभी राहिल्यानंतरही घरपट्टीसह मोकळ्या भूखंडावरचा करदेखील मालकांना अदा करावा लागतं आहे.

प्रत्यक्षात कराची रक्कम महापालिकेच्या हाती पडतं नसली तरी दफ्तरी मात्र दुहेरी कर दिसून येतो. असा एकूण ४८.९१ कोटींचा कर असून तो कर नील अर्थात शून्य करण्यासाठी महापालिकेच्या विविध कर विभागाकडून जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

दुहेरी करांच्या मालमत्ता एकेरी करावर आणता येणार आहे. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एका दिवसात निपटारा केला जाणार आहे. (NMC News Double Tax on vacant plots Special Campaign for Single Tax nashik news)

नाशिक महापालिकेकडून मोकळ्या भूखंडावर कर लावला जातो. सदर कर लावल्यानंतर वर्षानुवर्षं कर वसुलीची प्रक्रिया चालू राहते. परंतु कालांतराने त्या भूखंडावर व्यावसायिक किंवा निवासी प्रकारची इमारत उभी राहते.

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घरपट्टी लागू होते. घरपट्टी लागू झाल्यानंतर त्याप्रमाणे कराची दिशा निश्चित होते, मात्र यापूर्वी लागू करण्यात आलेल्या मोकळ्या भूखंडावरील कर मात्र कायम दिसून येतो.

या संदर्भात मिळकत धारकांकडूनदेखील दखल घेतली जात नाही व महापालिकेकडूनदेखील एखाद्या मोकळ्या भूखंडावर तयार करण्यात आलेल्या इमारतीला घरपट्टी लागू झाल्यानंतर मोकळ्या भूखंडावरील पट्टी वजावट केली जात नाही.

मिळकतधारकांना आपल्या मोकळ्या भूखंडावर कराची थकबाकी चढत असल्याची माहिती मिळत नाही, तर महापालिकेच्या एकूण थकबाकीमध्ये वर्षानुवर्षं मोकळ्या भूखंडावरील कर न भरल्याने थकबाकीची रक्कम वाढत असते.

आतापर्यंत ४८ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी एकूण थकबाकीमध्ये दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी विविध कर विभागाकडून जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

यात प्रत्येक विभागाला दोन दिवस याप्रमाणे मोकळा भूखंडावरील प्रकरणे नील करण्यासाठी मोहीम राबविली जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC News: बानाईत यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार!

"मोकळ्या भूखंडावरील कर व इमारत बांधून लागू झालेली घरपट्टी असे दुहेरी कर मोकळ्या भूखंडावर दिसतात. त्यामुळे मोकळ्या भूखंडावरील इमारत कर वगळता अन्य कर नील करण्यासाठी मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घेऊन करातून मिळकती मोकळ्या कराव्यात." - श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर विभाग.

विभागनिहाय दुहेरी कराच्या मालमत्ता

विभाग दुहेरी कर मालमत्ता

सातपूर- ४,३५७

पश्चिम- ६७२

पूर्व- २,९१२

पंचवटी- १३,८५३

सिडको- ७,५३३

नाशिकरोड- १,८३६

-------------------------------------------

एकूण ३१,१६३

NMC Nashik News
NMC Water Supply: नाशिककरांना दिलासा! पाणीटंचाईचा ‘सामना’ टळणार; पाणीपुरवठा विभागाकडून दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.