NMC News: गणेशोत्सवात अतिक्रमण पडणार महागात! चमकोगिरी करणाऱ्या इच्छुकांवर फौजदारी कारवाई

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News : गणेशोत्सवाच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची तयारी भाई-दादांनी केली असली तरी आता ही चमकोगिरी महागात पडणार आहे.

महापालिकेच्या दिशादर्शक कमानी, तसेच मुख्य चौकांमध्ये लागलेले बॅनर वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने त्यातून अपघाताची शक्यता बळावली आहे. त्याचबरोबर शहराला बकालपणाचे स्वरूप आल्याने अशा भाई-दादांचे बॅनर हटविण्याच्या, तसेच गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या.

दरम्यान, गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर अतिक्रमण विभागाने भाई-दादांशी पंगा नको म्हणून सुरू केलेल्या कारवाईत १७७ होर्डिंग, ७६ बॅनर, ५८७ झेंडे हटविल्याचा दावा केला. (NMC News Encroachment will be expensive during Ganeshotsav Criminal action against aspirants who flaunt nashik )

मार्च २०२२ मध्ये नाशिक महापालिकेची मुदत संपुष्टात आली. परंतु अद्यापही निवडणूक झालेली नाही. मात्र उत्सवाच्या निमित्ताने इच्छुक मतदारांसमोर जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात चमकोगिरी केली आहे.

मात्र ही चमकोगिरी करताना स्वतःच्या जागेत फलक, बॅनर उभारण्याऐवजी महापालिकेचे दिशादर्शक फलक, जनजागृती फलक, तसेच रस्त्यांवर, चौकांमध्ये वाहतुकीला अडथळा ठरतील अशा पद्धतीने लावण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे महापालिकेची परवानगी बंधनकारक असतानादेखील अनेक ठिकाणी विनापरवानगी उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली.

मात्र इच्छुकांची बॅनरबाजी शहर विद्रूपीकरण त्याचप्रमाणे वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या.

त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग्ज, फलक व बॅनर लावणाऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या सूचनादेखील आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अतिक्रमण विभागाने कारवाई करणे अपेक्षित होते.

मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये अतिक्रमण विभागाला अपेक्षित अशी कारवाईची माहिती सादर करता आली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.\

NMC Nashik News
Ganeshotsav 2023 : सोनमाळी विद्यालयात इको-फ्रेंडली गणपती ; कर्जतकरांची दर्शनासाठी गर्दी; शिक्षकांचा उपक्रम

कारवाई करताना राजकीय दबाव

अतिक्रमण विभागाकडून कारवाई करताना राजकीय नेत्यांचा दबाव आहे. दहा दिवसांसाठी उत्सव असल्याने या कालावधीत कारवाईकडे कानाडोळा करण्याची विनंतीच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. अतिक्रमण पथकामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे स्थानिक नेत्यांशी असलेले संबंधदेखील कारवाईला अडचण ठरत आहे.

अतिक्रमण विभागाची कारवाई

होर्डिंग - १७७

बॅनर - ७६

फ्लेक्स - १५४

झेंडे - ५८७

NMC Nashik News
Kolhapur Ganeshotsav : कोल्हापुरात उद्या गणेशोत्सवाची सांगता; 'हे' गणपती पाहिले नसतील तर आजच पाहून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.