NMC News : भूसंपादनाचा मोबदला निश्चित करताना अभियंते जबाबदार

NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar  latest marathi news
NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : महापालिकेकडून भूसंपादनाचा मोबदला देताना नगरनियोजन विभागाकडून संबंधित जागा मालकास मोबदला दिला किंवा नाही असा स्पष्ट उल्लेख नसल्याने त्यातून गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जमीन मालकाला मोबदला दिला की नाही, याबाबत स्पष्टीकरण नस्तीवरच नमुद करण्याच्या सूचना दिल्या आहे.

तशा सूचना नमुद नसल्यास कनिष्ठ अभिंयत्यांपासून कार्यकारी अभियंते जबाबदार धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे भूसंपादन करताना का व कशासाठी, तसेच आवश्‍यकता आहे का, यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. (NMC News Engineers responsible for determining compensation for land acquisition Nashik Latest Marathi News)

महापालिकेकडून आरक्षित करण्यात आलेल्या जमिनींचे भूसंपादन केले जाते. भूसंपादन करताना शहरी भागात दुप्पट, तर ग्रामीण भागात चारपट मोबदला द्यावा लागतो. महापालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भूसंपादनाचे प्रस्ताव सादर केले जातात. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात भूसंपादन झाले आहे. सिंहस्थ, तसेच भविष्यातही मोठ्या प्रमाणात शहरात भूसंपादन करावे लागणार आहे.

शहराचा विस्तार वाढत असताना दुसऱ्या शहर विकास आराखड्यात नमुद करण्यात आलेल्या आरक्षणाचा विचार करता मोठ्या प्रमाणात रक्कम लागणार आहे. त्यामुळे भूसंपादनाचे कोणतेही प्रस्ताव सादर करताना ज्या कारणासाठी जमीन संपादित करायची आहे, त्याचे तातडीचे कारण सविस्तरपणे नमुद करावे लागणार आहे.

NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar  latest marathi news
Swine Flu Alert : आतापर्यंत 22 जणांचा बळी

जमिनीचे संपादन झालेले नाही. तसेच, सदर जमिनीपोटी कोणताही एफएसआय किंवा टीडीआर जमीन मालकाला दिला नाही. याबाबतचे स्पष्ट प्रमाणिकरण संबंधित कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक संचालक व उपसंचालकांनी नस्तीवर नमुद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

...तर कारवाई

कोणत्याही परिस्थिती मोबदला देय नसताना मोबदला दिला गेल्यास त्याची जबाबदारी संबंधित कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक संचालक, उपसंचालक यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे.

NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar  latest marathi news
Crime Update : PAN Card अपडेटच्या नावाखाली 5 लाखांना गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()