NMC News: आकृतिबंध 9 हजार पदापर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी कसरत

NMC News
NMC News esakal
Updated on

NMC News : राज्य शासनाने मंजूर केलेल्या नवीन सेवा व शर्ती नियमावलीच्या आधारे महापालिकेकडून आकृतिबंध सादर करताना ९००० पदे मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विविध विभागाकडून आलेल्या अहवालात ९ हजारांपेक्षा अधिक पदे निर्माण झाल्यास त्या आकृतिबंधाची छाननी केली जाणार आहे. (NMC News Exercise to limit scheme to 9 thousand posts nashik)

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या आकृतिबंधाला मंजुरी देताना सात हजार ९२ पदे मंजूर करण्यात आली होती.

मात्र नाशिक महापालिकेला आता ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाला आहे. त्याचबरोबर शहराची लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत असल्याने एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सेवासुविधा पुरविताना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

त्यामुळे राज्य शासनाने महापालिकेला नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने २०१७ मध्ये १४,००० पदांचा आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत तो आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
Abhay Yojana: अभय योजनेंतर्गत 785 नळजोडणी अधिकृत; अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कारवाई

राज्य शासनाने नव्याने आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने १९ विभागांकडून माहिती मागवली त्यातील ४७ विभागांनी माहिती दिली. आरोग्य व घनकचरा विभागाने अद्यापपर्यंत माहिती दिलेली नाही.

नवीन आकृतिबंध सादर करताना वास्तववादी असावा, अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पदांचा आकृतिबंध ९ हजार पदापर्यंत मर्यादित ठेवण्याची कसरत प्रशासनाकडून सुरू आहे.

महापालिकेने आकृतिबंध छाननीसाठी समिती गठित केली आहे. नऊ हजारापेक्षा अधिक पदे होत असतील तर आकृतिबंधाची छाननी केली जाणार आहे. ९००० पदापर्यंत आकृतिबंध राहिल्यास जसाच्या तसा शासनाला सादर केला जाणार आहे.

NMC News
Nashik ZP News: रस्त्यांच्या दर्जासाठी ऑनलाइन ॲप! कामाच्या प्रत्येक टप्प्यावर राहणार नजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.