NMC News : प्रशासकीय शिस्तीत नाशिक महानगरपालिका राज्यात प्रथम!

Commissioner Dr. Nashik Municipal Corporation came first in the state in saving establishment costs with record recovery, National Livelihood Campaign. Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis while felicitating Chandrakant Pulkundwar. Adjacent Education Minister Deepak Kesarkar, Legislative Assembly Speaker Rahul Narvekar.
Commissioner Dr. Nashik Municipal Corporation came first in the state in saving establishment costs with record recovery, National Livelihood Campaign. Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis while felicitating Chandrakant Pulkundwar. Adjacent Education Minister Deepak Kesarkar, Legislative Assembly Speaker Rahul Narvekar.esakal
Updated on

NMC News : आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विक्रमी कर वसुली, प्रशासकीय खर्चात कपात तसेच, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानातील समाधानकारक कामगिरीत नाशिक महापालिकेने ‘अ’, ‘ब’, ‘क’ या तिन्ही वर्गात राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान केला.

तर केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडिया सायकल चॅलेंज अंतर्गत फ्रीडम टू वॉक सायकल रन स्पर्धेतही नाशिकने प्रथम क्रमांक पटकावला. (NMC News First in administrative discipline in municipal state nashik news)

नगरविकास दिनानिमित्त मुंबईत सत्कार सोहळा पार पडला. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये पहिल्या क्रमांकासाठी नाशिक शहराची धडपड सुरु आहे. अद्याप पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याचे स्वप्न पूर्ण होत नसले तरी प्रशासकीयदृष्ट्या कामकाजातील सुधारणांचा लाभ महापालिकेच्या पदरी पडला आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये महापालिकेची वसुली पूर्ण झाली नाही त्यामुळे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी राबविलेल्या मोहिमेत कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले.

प्रारंभी १५० कोटींचे उद्दिष्ट होते. मार्च अखेरीस १२५ टक्के वसुली म्हणजे १८८ कोटी ७३ लाख रुपये वसुली झाली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी वसुली झाली. दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) अंतर्गत सर्व घटकांमध्ये १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.

बचत गट बनविणे, त्यांना शासनाकडून फिरता निधी देणे तसेच, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगाराकरीत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे, बेघर व्यक्तींना बेघर निवारा केंद्रा अंतर्गत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे या सर्व घटकांमध्ये महापालिकेने उत्कृष्ट काम केले.

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजने अंतर्गत महाराष्ट्रात १४० टक्के काम करून महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपायुक्त करुणा डहाळे उपस्थित होत्या.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Commissioner Dr. Nashik Municipal Corporation came first in the state in saving establishment costs with record recovery, National Livelihood Campaign. Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis while felicitating Chandrakant Pulkundwar. Adjacent Education Minister Deepak Kesarkar, Legislative Assembly Speaker Rahul Narvekar.
Nashik ZP News : जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांची प्रशासनाकडून तयारी; सेवाज्येष्ठता यादीसाठी मागविली माहिती

आस्थापना खर्चात कपात

२०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी मनुष्यबळाचे योग्य नियोजन केले. प्रभावी उपाययोजना राबवून ३३.०३ टक्के एवढा प्रशासकीय खर्च मर्यादित ठेवण्यात यश मिळविले. आस्थापना खर्च आटोपशीर ठेवल्याने खर्चाचा भार कमी झाला.

‘सायकल रन’ मध्येही डंका

केंद्र सरकारच्या वतीने इंडिया सायकल चॅलेंज अंतर्गत फ्रीडम टू वॉक सायकल रन स्पर्धा घेण्यात आली, त्यात नाशिक शहराचा प्रथम क्रमांक आला. प्रदूषण टाळणे, नॉन मोटराईज ट्रान्स्पोर्टला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील सर्व शहरांना सायकलिंक आणि वॉकिंगची सवय लागावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यात देशातील १५० हून अधिक शहरांनी सहभाग नोंदविला. चार टप्प्यांपैकी स्पर्धेचा पहिला टप्पा एक फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान पार पडला. स्पर्धेच्या कालावधीत स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी ७२५ किलोमीटर चालून चौथा क्रमांक पटकावला. स्थापत्य विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक राजाराम हिरे ४९५ किलोमीटर चालले त्यांनी आठवा क्रमांक पटकावला.

नगररचनाकार माधुरी जावळे महिला श्रेणीत ३४० किलोमीटर चालल्या त्यांना तिसरा क्रमांक मिळाला. वित्त विभागाच्या ऐश्वर्या कदम २९६ यांनी किलोमीटर सायकलिंग केली त्यांना पाचवा क्रमांक मिळाला. स्थापत्य विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक दुर्गेश ओझरकर यांनी पहिला क्रमांक मिळविला. निखिल भोईर धावण्यात दुसरे आले.

Commissioner Dr. Nashik Municipal Corporation came first in the state in saving establishment costs with record recovery, National Livelihood Campaign. Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis while felicitating Chandrakant Pulkundwar. Adjacent Education Minister Deepak Kesarkar, Legislative Assembly Speaker Rahul Narvekar.
Market Committee Election: जिल्हा निवडणूक आधिकाऱ्यांकडूनही अर्ज अवैध; पवारांची उच्च न्यायालयात धाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.