नाशिक : दीपावलीनिमित्त शहरात कचरा संकलनात वाढ झाली आहे. दररोज साडेसहाशे टन घनकचरा संकलित होतो. दिवाळीनिमित्त मात्र गेल्या दहा ते १२ दिवसांपासून सव्वाशे टन अतिरिक्त कचरा संकलित होत आहे. (NMC News Increase in waste collection during Diwali average of half ton of extra waste Nashik News)
महापालिकेच्या सहाही विभागांत सरासरी कचरा संकलन वाढले आहे. दिवाळी असल्याने सध्या सरासरी १०० ते १२० टन कचरा जास्त उचलला जात आहे. महापालिकेकडून सरासरी दररोज ६५० ते ६६० टन कचरा संकलित केला जातो. महापालिकेने १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबविली होती. त्यात कचरा संकलन जास्त होत असल्याचे दिसून आले.
दिवाळीनिमित्त पाचही दिवस कचरा संकलनाची मोहीम सुरू राहणार आहे. ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, घरगुती घातक वैद्यकीय कचरा, विद्युत कचरा, असे वर्गीकरण करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कचरा डब्याचे रंगही वेगळे असावेत, अशी सूचना आहे. ‘माझी दिवाळी, स्वच्छ दिवाळी’
या अनुषंगाने नागरिकांनी सणाचा आनंद लुटावा, शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, तसेच दिवाळीनिमित्त प्लॅस्टिक न वापरण्याचाही संकल्प नागरिकांनी करावा, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे. घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाही विभागांचे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता मोहीम राबवीत आहेत.
बारा दिवसांतील कचऱ्याची आकडेवारी
तारीख वजन ( टनामध्ये)
११ ऑक्टोबर : ७५४.१२
१२ ऑक्टोबर : ७७५.७०५
१३ ऑक्टोबर : ७२७.०६
१४ ऑक्टोबर : ७०९.४७
१५ ऑक्टोबर : ७६६.६३५
१६ ऑक्टोबर : ७४०.७२
१७ ऑक्टोबर : ७३३.५७५
१८ ऑक्टोबर : ७५०.२१५
१९ ऑक्टोबर : ७८९.५१
२० ऑक्टोबर : ७८०.३३५
२१ ऑक्टोबर : ७६६.१२५
२२ ऑक्टोबर : ७८५.६९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.