NMC News: स्थानिक विरुद्ध परसेवेतील अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष! तांत्रिक संवर्गातील पदे उपायुक्तांच्या अधिनस्त

nmc
nmcesakal
Updated on

NMC News : तांत्रिक संवर्गातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, नगररचना तसेच बांधकाम विभाग उपायुक्तांच्या अधिनस्त आणण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाल्याने तांत्रिक संवर्गातील स्थानिक अधिकारी व परसेवेतील अधिकारी असा सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे.

त्यातून महापालिकेच्या पायाभूत सुविधांच्या कामकाजावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणीपुरवठा विभाग, विविध कर उपायुक्तांच्या अधिनिस्त आणल्याने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. (NMC News Latent conflict between local and senior officials Technical Cadre posts under Deputy Commissioners nashik)

महापालिकेत प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने तांत्रिक व अतांत्रिक असे दोन संवर्ग आहे. अभियांत्रिकी संदर्भातील कामे तांत्रिक, तर प्रशासकीय व शासन नियमांची अंमलबजावणी करण्याची कामे अतांत्रिक संवर्गातील अधिकारी करतात.

विद्युत, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, बांधकाम विभाग, नगररचना विभागात तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांची आवश्‍यकता आहे. परंतु आता प्रशासनात आयुक्त व उपायुक्त सर्वच नवीन आले आहे.

त्यामुळे प्रशासकीय पातळीवर बदल सुरू झाले आहेत. तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांची माहिती संकलित करण्याचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर उपायुक्तांकडे पदभार देण्यास सुरवात झाली आहे.

तांत्रिक संवर्गाशी संबंधित कामे किंवा प्रस्ताव मंजुरीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. त्या-त्या विभागांच्या प्रमुखांमार्फत अतिरिक्त आयुक्त किंवा काही विभाग थेट आयुक्तांना प्रस्ताव सादर करतात.

परंतु आता तांत्रिक संवर्गासाठीदेखील उपायुक्त नियुक्त करण्यास सुरवात झाली आहे. शासन नियुक्त उपायुक्तांमार्फत प्रस्ताव सादर होतील. याचाच अर्थ शैक्षणिक अर्हता व वेतन अधिक असले तरी उपायुक्तांमार्फत विद्युत, बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा तसेच मलनिस्सारण विभागाचे प्रस्ताव जातील, अशी व्यवस्था महापालिकेच्या प्रशासकीय सेवेत आणण्यास सुरवात झाली आहे.

सर्वाधिक डोकेदुखी असलेला अतिक्रमण विभाग मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यानंच सांभाळावा लागणार आहे. मलाईदार विभाग जर उपायुक्तांकडे जात असतील तर अतिक्रमण विभाग का नाही, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

nmc
Nashik NCP News: येवला मतदारसंघ पक्षाध्यक्ष पवारांना खंबीर साथ देणार : माणिकराव शिंदे

विद्युत, मलनिस्सारण, पाणीपुरवठा (यांत्रिकी) या तीन विभागाचा पदभारदेखील पुढील महिन्यापासून उपायुक्तांच्या अधिनिस्त आणला जाणार आहे. तांत्रिक संवर्गातील विभाग उपायुक्तांच्या अधिनिस्त आणले जाणार असल्याने यामुळे नाराजी निर्माण झाली आहे.

शैक्षणिक अर्हतेचा विचार केल्यास तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न अभियंते सोडवू शकतात. त्यामुळे उपायुक्तांची आवश्‍यकता नाही. शिवाय नाशिक महापालिकेच्या अभियंत्यांचा वेतनस्तर उपायुक्तांपेक्षा कमी असल्याने कमी वेतनाच्या अधिकाऱ्यांकडे प्रश्न कसे घेऊन जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टेबल व वेळही वाढणार

तांत्रिक संवर्गातील पाणीपुरवठा, नगररचना, बांधकाम, मलनिस्सारण, यांत्रिकी विभाग अतिरिक्त आयुक्तांशी संबंधित असतात. आता उपायुक्तांच्या अधिनिस्त केल्याने कामकाजाचा एक टेबल वाढला आहे. फाइलींचा प्रवास आता लांबणार आहे.

"सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (पाणीपुरवठा) विभाग आता विविध कर उपायुक्तांच्या अधिनिस्त राहणार आहे. अतिरिक्त आयुक्तांकडे फाइल जाण्यापूर्वी उपायुक्तांची मंजुरी आवश्‍यक राहील. महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार बदल करण्यात आला आहे."

- लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त, प्रशासन, महापालिका.

nmc
Onion Crisis: कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.