NMC News: मनपाचा पेट्रोलपंप पुन्हा कार्यान्वित!

NMC Latest News
NMC Latest Newsesakal
Updated on

NMC News : भारत पेट्रोलियम कंपनीकडून बाजारभावाप्रमाणे इंधन खरेदी करण्याची तयारी दर्शविण्यात आल्यानंतर महापालिकेचा स्व:मालिकेचा पेट्रोलपंप पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या माध्यमातून महापालिकेची वार्षिक ३२ लाख रुपये बचत होणार आहे. (NMC News Municipal petrol pump operational again nashik)

नाशिक महापालिकेच्या वाहनांमध्ये खासगी पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेल भरले जाते. सध्या २१३ वाहने महापालिकेच्या मालकीची आहे. यापूर्वी पंचवटी विभागातील भांडार विभागाच्या जागेत महापालिकेचा पेट्रोलपंप होता. भारत पेट्रोलियम कंपनीमार्फत या पंपावर इंधन पुरवठा केला जात होता.

महापालिकेच्या वाहनांसाठी मासिक वीस हजार लिटर डिझेलची खरेदी केली जात होती. केंद्र सरकारने धोरण बदलले. त्यामुळे या पंपाकरिता डिझेल पुरवठा करताना महापालिकेला खरेदीवर १३ रुपये प्रतिलिटर जादा दराने डिझेल पुरवठा करण्यात आला.

त्यामुळे महापालिकेला दरवर्षी ३२ लाख रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. लेखापरीक्षणात यावर ताशेरे ओढण्यात आल्यानंतर महापालिकेने स्वतःचा पंप बंद करून खासगी पंपधारकांकडून इंधन खरेदी करणे सुरू केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लेखापरीक्षकांनी पुन्हा आक्षेप नोंदविला. त्यामुळे इंधन पुरवठादारांकडून देकार मागण्यात आले. पाच वेळा मुदतवाढ देऊनही एकाही इंधन पुरवठादारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेकडून देयके मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेता प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे महापालिकेने भारत पेट्रोलियम कंपनीला पुरवठा करण्याची विनंती केली होती. कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेचा भांडार विभागात यापूर्वी असलेला पंप पुन्हा कार्यान्वित झाला आहे.

NMC Latest News
Nashik Civil Hospital: सिव्हिल पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.