NMC News : ऑनलाइन बांधकाम परवानगी सुरू

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : नगररचना विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या परवानग्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करण्यात आल्यानंतर १ एप्रिलपासून सर्व बांधकाम परवानगी ऑनलाइन पद्धतीने दाखल करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक महापालिकेला १२ एप्रिलला शासनाचे आदेश प्राप्त झाले. त्याअनुषंगाने गुरुवार (ता. १३) पासून बांधकाम परवानगीची प्रकरणी ऑनलाइन पद्धतीने दाखल करून घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. (NMC News Online construction permit started nashik news)

राज्य शासनाने मुंबई वगळता संपूर्ण राज्य सारखी एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू केली आहे. त्याअनुषंगाने नवीन तरतुदीनुसार बांधकाम परवानगी प्रक्रिया फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी ऑटो डीसीआर प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन परवानगी दिली जात होती. परंतु, या प्रणालीत त्रुटी असल्याने बीपीएमएस ही नवीन संगणकीय प्रणाली शासनाने लागू केली आहे. परंतु बीपीएमएस संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाच्या महाआयटी कंपनीकडून हवे तसे तांत्रिक पाठबळ मिळाले नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

NMC Nashik News
Birsa Munda Kranti Yojana : आदिवासी शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान! लाभ घेण्याचे आवाहन

त्यामुळे तांत्रिक दोष दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत ऑफलाइन परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने १ एप्रिलपासून ऑनलाइन परवानगी सुरू झाल्या. मात्र, नाशिक महापालिकेला १२ एप्रिलला शासनाकडून आदेश प्राप्त झाले.

त्याअनुषंगाने गुरुवारपासून ऑनलाइन बांधकाम परवानगी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

NMC Nashik News
Citylinc Strike : सिटीलिंक चालक, वाहकाचे कामबंद आंदोलन; देयके अदा केल्यानंतर बससेवा पुर्ववत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.