NMC News: धोकादायक वाडे खाली करण्यासाठी पोलिसांची मदत

Old Wadas
Old Wadasesakal
Updated on

NMC News : इरसाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडमध्ये आली असून, शहरातील अतिधोकादायक ठरलेले वाडे तातडीने खाली करावे.

जागा मालकांनी तांत्रिक कारण समोर केल्यास तेथील वीजपुरवठा खंडित करून वाडे खाली करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची सूचना महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी दिल्या. (NMC News Police help to demolish dangerous mansions nashik)

महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकादायक वाड्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. धोकादायक वाड्यांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत दरवर्षी विभागीय अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात येतात.

मात्र पावसाळा झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येते. इरसाळवाडी येथील दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा धोकादायक वाड्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याअनुषंगाने धोकादायक वाडे तातडीने खाली करावे.

धोकादायक वाडे खाली न झाल्यास तेथील वीज व पाणीपुरवठा बंद करावा पोलिसांचीदेखील मदत घ्यावी. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात ११९२ धोकादायक वाडे व इमारती आहे

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Old Wadas
Nashik News: सिव्हिलमधील ‘सिटी स्कॅन’ आठवडाभरापासून बंद! संदर्भसेवा रुग्णालयात रुग्णांना हेलपाटे

धोकादायक वाडे व घरे

विभाग संख्या

पश्चिम ७०१

पूर्व १२७

सिडको ५०

पंचवटी १७६

नाशिकरोड ७७

सातपूर ६१

---------------------------------

एकूण १२९७

Old Wadas
Raju Shetti Latest : टोमॅटोचा लालचिखल झाला, तेव्हा नाफेड होते कुठे? राजू शेट्टींचा सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.