NMC News : महापालिकेच्या वैद्यकीय विभागात डॉक्टरांच्या विभागांमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे महत्त्वाची खाती मिळविण्यासाठी महापालिकेत सुरू असलेली धडपड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
काही दिवसांपूर्वी अभियंत्यांमध्ये महत्त्वाची पदे मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. आता वैद्यकीय विभागात अशाच प्रकारची रस्सीखेच पाहायला मिळत आहे. (NMC News tug of war in medical department again in discussion nashik)
शहर क्षयरोग अधिकारी डॉ. आवेश पलोड यांची घनकचरा विभागात संचालक पदावर बदली करण्यात आली. त्यांच्या जागी घनकचरा विभागात कार्यरत असलेल्या डॉ. कल्पना कुटे यांची बदली वैद्यकीय विभागात करण्यात आली.
आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी डॉ. प्रशांत शेटे यांच्याकडे असलेला सहाह्यक वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार सोपविला. रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर रजिस्ट्रेशन, बायोमेडिकलचे काम सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत होते.
डॉ. पलोड यांच्याकडे असलेला शहर क्षयरोग अधिकारी पदाचा पदभार डॉ. शेटे यांच्याकडे दिला. अदलाबदलीमुळे नाराज झालेल्या डॉ. शेटे यांनी वजन वापरल्यानंतर आयुक्त डॉ. करंजकर यांनी अधिकारात पुन्हा फेरबदल केले.
डॉ. कुटे यांच्याकडे शहर क्षयरोग अधिकारी पदाचा पदभार सोपविला. अवघ्या पंधरा दिवसातच वैद्यकीय विभागात झालेल्या बदलीमुळे महत्त्वाची व मलाईदार पदे मिळविण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच पुन्हा चर्चेत आली.
वास्तविक महापालिका मुख्यालयात डॉक्टरांची आवश्यकता नाही. महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याने मानधनावर भरले जात असताना महापालिका मुख्यालयात काम करण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच नेमकी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.