NMC News: रिंगरोड साठी अडीच पट TDR?

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या वाहतुकीला बाह्य वळणाद्वारे वळविण्यासाठी ५६ किलोमीटरचे दोन रिंग रोड तयार केले जाणार आहे,

त्यासाठी जवळपास 268 हेक्टर जमीन लागणार असून त्यासाठी अडीच पट टीडीआरनुसार ६७ लाख चौरस मीटरचा टीडीआर लागू शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे. ()NMC News Two half times TDR for Ring Road)

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी नाशिक महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. राज्य शासनाकडून अद्याप निधीची घोषणा झाली नसली तरी शासनाकडून पायाभूत सुविधांसंदर्भात निधीची मागणी केली जाणार आहे.

पायाभूत सेवा सुविधांच्या संदर्भात पहिल्या टप्प्यात नाशिक शहरात येणारी वाहतूक बाह्य वळणाद्वारे वळविण्यासाठी २६ व ३० किलोमीटरचे दोन असे एकूण ५६ किलोमीटरचे रिंग रोड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिका खत प्रकल्पापासून पाथर्डी शिवारातून वालदेवी नदीला समांतर पिंपळगाव खांब शिवार, तसेच पुढे वालदेवी नदी पलीकडे विहीतगाव शिवार, विहीतगावपासून पुढे नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून चेहेडी शिवारातून पंचक गाव पुढे माडसांगवी शिवारातून महापालिका हद्दीबाहेर छत्रपती संभाजीनगर रोडलगत आडगाव शिवार व ट्रक टर्मिनस पर्यंत साठ मीटरचा पहिला रिंग रोड आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
Nashik Water Tanker: राज्यात गतवर्षांपेक्षा 134 टँकर जास्त! टंचाईत साताऱ्याने नाशिकला केले ‘ओव्हरटेक'

तर आडगाव ट्रक टर्मिनस येथून ३६ मीटर रुंदीचा दुसरा रिंग रोड आहे. आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, नाशिक तालुक्यातील जलालपूर, बारदान फाटा, गंगापूर रोड, ओलांडून गंगापूर उजवा तट कालवा, सातपूर एमआयडीसी, पश्चिम भागालगत त्र्यंबक रोड पर्यंत व पुढे गरवारे पॉइंट पर्यंत दुसरा रिंग रोड आहे.

त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अंदाज तयार केला जात आहे. ५६ किलोमीटरच्या बाह्य रिंग रोड साठी अडीच पट मोड बदला दिल्यास २६८ हेक्टर जागा लागेल.

चौरस मीटर मध्ये गणित मांडल्यास ६७ लाख चौरस मीटर महापालिकेला द्यावा लागेल. असा प्राथमिक अंदाज आहे. तसे झाल्यास टीडीआर चे भाव कोसळू नये याची देखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.

NMC Nashik News
Ramdas Athawale: आरपीआय- पॅंथर एकत्र काम करतील : रामदास आठवले यांना विश्वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.