NMC News: फुले दांपत्याच्या पुतळा उभारणीत अडथळे! परवानगी मिळूनही फाइल टेबलावरच

NMC News
NMC Newsesakal
Updated on

Nashik News : महापालिकेकडून मुंबई नाका या शहराच्या प्रवेशद्वारावरील वाहतूक बेटावर फुले दांपत्यांचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूददेखील करण्यात आली आहे.

मात्र, सर्व प्रकारच्या परवानगी मिळूनही महापालिकेकडून पुतळा बसविण्यासंदर्भातील फाइल हलत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सामाजिक कार्यकर्ते समाधान जेजुरकर यांनी महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांची भेट घेऊन तातडीने परवानग्यांमधील अडथळे दूर करण्याची मागणी केली. (Obstacles in erecting the statue of Phule couple Even with permission file still on table Nashik News)

मुंबई नाका येथे महात्मा फुले व सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्याची अनेक वर्षांची मागणी केली जात आहे. त्याअनुषंगाने फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूददेखील करण्यात आली.

त्याअनुषंगाने महासभेच्या पटलावर विषय सादर करण्यात आला. महापालिका आयुक्तांनी पोलिसांकडून परवानगी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यानंतर पोलिसांकडूनदेखील तातडीने परवानगी देण्यात आली.

परंतु, महापालिकेकडून पुतळ्यासाठी आवश्‍यक असलेल्या परवानग्यांचा अडथळा दूर होताना दिसतं नाही. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी परवानगीची फाइल तयार करून मसुरी येथील प्रशिक्षणावरून आल्यावर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
NMC Water Tap Connection: अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाला मुदतवाढ

परंतु हजर होण्यापूर्वीच त्यांची बदली साखर आयुक्त पदावर झाली. मध्यंतरीच्या काळात आयुक्तांचा कार्यभार प्रभारी होता. अद्यापही पूर्णवेळ आयुक्त नसले तरी नव्याने प्रभारी पदाचा कार्यभार देण्यात आलेल्या बानाईत यांची भेट घेऊन पुतळा संदर्भातील अडथळे दूर करण्याची मागणी समाधान जेजुरकर यांनी केली.

दरम्यान, पंचवटी कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ व महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला जाणार आहे. येथेही अद्याप पुतळा बसविण्याचे काम झालेले नाही. बी. डी. भालेकर हायस्कूलजवळ अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच शिवाजी उद्यानात राजमाता जिजाऊ स्मारकाची उभारणी केली जाणार आहे.

त्या कामालादेखील अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा उभारण्याचे भाजपच्या सत्ताकाळात नियोजन होते. परंतु स्मारकाच्या पुनर्विकासात पुतळा राहणार असल्याने पुतळा उभारणीचे काम रद्द करण्यात आले.

"मुंबई नाका येथील फुले दांपत्यांच्या पुतळ्या संदर्भातील सर्व प्रकारची परवानगी घेण्यात आली आहे. परंतु महापालिकेकडून फाइलवर अंतिम स्वाक्षरी होत नाही. प्रभारी आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. परवानगी मिळाल्यास पुतळा तयार करण्यास एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल. तोपर्यंत मुंबई नाका सर्कलचा घेर कमी करणे तसेच मेट्रो निओची अलायमेंटदेखील निश्चित होईल." - समाधान जेजुरकर, प्रदेश सरचिटणीस, महात्मा फुले समता परिषद

NMC News
Hemant Godse: ‘किकवी’साठीची विखंडित निविदा पुन्हा कार्यान्वित करण्यास मान्यता : खासदार गोडसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.