NMC Pest Control Contract: ‘दिग्विजय एंटरप्राइजेस’ला औषध फवारणी ठेका चर्चेविना

nmc
nmcesakal
Updated on

NMC Pest Control Contract : धूर फवारणी करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत असताना नाशिक रोड, पंचवटी तसेच पूर्व विभागासाठी ‘दिग्विजय एंटरप्राइजेस’ ला औषध फवारणीचा ठेका चर्चेविना देण्यात आल्याने महापालिकेचा मलेरिया विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (NMC Pest Control Contract Spraying contract to Digvijay Enterprises without discussion nashik)

दिग्विजय एंटरप्राइजेस या मक्तेदार कंपनीची धूर फवारणीची मुदत ७ ऑगस्ट २०१९ मध्ये संपुष्टात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये नवीन ठेका देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली.

तीन वर्षासाठी १८ कोटींचा ठेका होता, तो ४६ कोटी रुपयांवर गेल्याने निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आले. याविरोधात दिग्विजय एंटरप्राइजेसने ऑक्टोबर २०२० मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. यादरम्यान दिग्विजय एंटरप्राइजेसला वारंवार मुदतवाढ देण्यात आली.

नाशिक रोड, पूर्व, पंचवटी या तीन विभागासाठी दिग्विजय एंटरप्राइजेसला काम देण्यात आले आहे. मात्र सोमवारी (ता. ११) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रस्ताव कसा मंजूर झाला याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी तसेच शहरात कुठल्या भागामध्ये धूर फवारणी झाली याचीदेखील चौकशी करून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिग्विजय एंटरप्राइजेसमार्फत २०१६ पासून काम होत आहे. मात्र सदर कामे फक्त कागदावर दिसत असल्याने काळे यादी टाकावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा शहराध्यक्ष ठाकरे यांनी दिला.

तर नवीन ठेक्यांमध्ये तीन विभागांचे काम दिग्विजय एंटरप्राइजेसला स्थायी समितीच्या मान्यतेने दिल्याचा दावा जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केला.

nmc
Shravan Somvar: कपालेश्‍वरासह सोमेश्‍वरला दर्शनासाठी लोटली गर्दी! शेवटच्या श्रावणी सोमवारमुळे पहाटेपासून रांगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()