NMC News: महापालिका प्रमोशन कमिटीला उच्च न्यायालयाचा दणका! 4 आठवडे बैठकीला स्थगिती

Mumbai High Court
Mumbai High Courtesakal
Updated on

NMC News : चुकीच्या पद्धतीने महापालिकेत अभियंत्यांना दिलेल्या पदोन्नत्यावरून दावा दाखल असताना पुन्हा चार ते पाच अभियंत्यांना पदोन्नती देण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) होत असलेल्या बैठकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

चार आठवडे स्थगिती देण्यात आल्याने पदोन्नती कमिटीला मोठा दणका मानला जात आहे. (NMC Promotion Committee slapped by High Court Adjournment of meeting for 4 weeks nashik)

महापालिकेत गेले काही वर्षात सातत्याने चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिली जात आहे. जम्पिंग प्रमोशन हा यातील वादग्रस्त मुद्दा आहे. माजी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांच्या कार्यकाळात चुकीच्या पद्धतीने जम्पिंग प्रमोशन देण्यात आले.

यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने पदोन्नती देण्यात आली होती. बांधकाम विभागात सध्या कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सचिन जाधव व अन्य काही अभियंत्यांना अशाच पद्धतीने जम्पिंग प्रमोशन देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mumbai High Court
NMC News: बेकायदेशीर फलकांवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी विभागांवर

ज्येष्ठता डावलून पदोन्नती देण्यात आल्याने याविरोधात उपअभियंता रवींद्र पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात दावा दाखला असताना महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी (ता. १५) पदोन्नती समितीची बैठक बोलविण्यात आली.

बैठकीत काही अभियंत्यांच्या पदोन्नतीवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची चर्चा होती. उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वतीने काम पाहणारे ॲड. सचिन कदम यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली. त्यावर न्यायालयाने चार आठवड्यांची स्थगिती आणली आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.

Mumbai High Court
NMC News: काम पूर्ण होण्याअगोदरच काँक्रिट रस्त्याची लागली वाट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.