नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांवर(Corona patients) उपचार करताना रेमडेसिव्हिर इंजेक्शनची(Remdesivir injection) आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेने दिले असले तरी महापालिकेने गुजरातच्या मायलन(Mylan) कंपनीकडून पाच हजार नव्या इंजेक्शनची मागणी नोंदविली आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेला एक हजार इंजेक्शन प्राप्त झाल्याने रुग्णालयांमध्ये तुटवडा नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. (Nashik Municipal Corporation purchase five thousand Remdesivir injections)
इंजेक्शन खरेदीवर प्रश्नचिन्ह?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बेड, ऑक्सिजन(Oxygen) व व्हेंटिलेटर(Ventilator) बेडचा तुटवड्यानंतर नागरिकांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. महापालिकेने आतापर्यंत दहा हजार इंजेक्शन खरेदी केले. जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) रेमडेसिव्हिर इंजेक्शन फिजिशिअनच्या सल्ल्यानुसारच घेण्याचा सल्ला दिला असताना महापालिकेने आता पुन्हा नव्याने पाच हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी गुजरातमधील मायलन कंपनीकडे नोंदविली आहे. आगाऊ पैसे भरल्यानंतर यातील एक हजार इंजेक्शन बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयात प्राप्त झाले आहे. वास्तविक आरोग्य संघटनेने रेमडेसिव्हिर इंजेक्शनची आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, तर दुसरीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना महापालिकेच्या इंजेक्शन खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.