NMC Recruitment: मानधनावर रिक्तपदे भरण्याचे प्रयत्न

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC Recruitment : आरोग्य व वैद्यकीय विभागाची पदे तातडीने भरण्यासाठी महापालिकेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संस्थेची नियुक्ती केली असताना दुसरीकडे महसुली खर्चाची ओलांडलेली मर्यादा लक्षात घेता मानधनावर रिक्त पदे भरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. (NMC Recruitment Efforts to fill vacancies on salary nashik)

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर २००२ मध्ये जवळपास बाराशे मानधनावरील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार भरती झाली, त्यानंतर मात्र अद्यापही भरती झालेली नाही.

त्यामुळे जुन्या आकृतिबंधातील जवळपास ७०९२ पदांपैकी २८०० पदे रिक्त झाली आहेत. दुसरीकडे शहराची लोकसंख्या वाढली तर महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे १४ हजार पदांचा नवा आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला.

परंतु, शासनाने तो आकृतिबंध फेटाळताना नव्याने पदांचा आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण ३९ विभागांपैकी नऊ विभागांकडून अद्यापही माहिती देण्यात अडचणी निर्माण केल्या जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC School: विद्यामंदिर बनले मधुशाला! हुंडीवाला लेन येथील महापालिकेच्या शाळेत मद्यपींचा वावर

दरम्यान, आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व विभाग प्रमुखांनी आवश्यक कमीत- कमी पदे भरण्याबाबत शिफारस करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे शासनाने डिसेंबरपर्यंत आस्थापना खर्च मर्यादेची अट शिथिल केली आहे.

त्यामुळे रिक्तपदांची भरती करता येणे शक्य आहे. राज्य शासनाने आस्थापना खर्चाची अट शिथिल केल्याने रिक्तपदे भरता येणे शक्य असले तरी प्रशासनाकडून मानधनावर भरती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

NMC Nashik News
NMC Shool News : महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डिसले गुरुजी पॅटर्न’ राबविला जाणार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.