NMC Recruitment: महापालिकेची भरती प्रक्रिया रखडली; बेरोजगारांचे भरतीकडे डोळे

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC Recruitment : महापालिकेतील आरोग्य- वैद्यकीय व अग्निशमन विभागातील एकूण ७०६ पदांसाठी टाटा कन्सल्टन्सीमार्फत भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जुलैअखेर भरती प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते.

परंतु मागील दीड महिन्यांपासून महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्याने भरती प्रक्रियादेखील रखडली आहे. नियमित आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर भरती होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. (NMC Recruitment Municipal recruitment process stalled as a result of no full time commissioner nashik)

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७ हजार ८२ पदे मंजूर आहेत. त्यातील २८०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहे. महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने १४ हजार पदांचा सुधारित आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.

परंतु, अद्याप आराखडा मंजूर करण्यात आलेला नाही. आराखडा सादर झाल्यापासून राज्यात तीन वेगवेगळ्या पक्ष्यांची सरकारी आली, मात्र फक्त आश्वासनात व्यतिरिक्त पदरात काही पडले नाही.

नियमित रिक्त पदे भरण्यासाठीदेखील राज्य शासनाने महसूल खर्चाची अट टाकली आहे. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल, तर रिक्त पदांची भरती करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

परंतु, कोविडकाळात वैद्यकीय व अग्निशमन या महत्त्वाच्या विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदे भरण्यास नाशिक महापालिकेला मंजुरी मिळाली आहे.

७०६ रिक्त पदांची भरती करण्यासाठी महापालिकेने टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस या कंपनीची तीन वर्षांचा करार केला.

करार केल्यानंतर जुलै महिन्यात भरती प्रक्रिया राबवून ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेपासून नवनियुक्त कर्मचारी सेवेत दाखल होतील, असे त्या वेळी सांगितले होते, मात्र अद्यापही भरती प्रक्रिया झालेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
SAKAL Impact: अखेर नळावाटे पिण्यायोग्य पाणी; NMC पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवशी शोधला दोष

नवीन आयुक्तांच्या नियुक्तीनंतर भरती

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससोबत तीन वर्षाचा करार मे महिन्यात पूर्ण झाला. जून महिन्यात जाहिरात काढून परीक्षा घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. जुलै अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्टपासून नियुक्तीपत्र दिले जाणार होते.

त्यासाठी ४७५ ते ६७५ रुपये फीदेखील निश्चित झाली. मात्र तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले. त्यांच्या पदाचा तात्पुरता कार्यभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे देण्यात आला.

प्रशिक्षणाहून परतत असतानाच पुलकुंडवार यांची राज्याच्या सहकार आयुक्त पदावर बदली झाली. त्यानंतर अद्याप नाशिक महापालिकेचे आयुक्त पद प्रभारींच्या हाती आहे. महापालिकेला पूर्ण वेळ आयुक्त मिळत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रियादेखील होणार नाही.

नवीन आयुक्त दाखल झाले तरी किमान दोन- तीन महिने प्रक्रिया समजून घेण्यात जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ऑगस्ट महिन्यात भरती होईल असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्यासाठी डिसेंबरअखेर उजाडेल, असे बोलले जात आहे.

NMC Nashik News
NMC Promotion: महापालिकेतील नवीन पदोन्नत्या अखेर रद्द; नवीन सेवा- प्रवेश नियमावलीनुसार होणार प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.