NMC Fireman Recruitment: विद्यावेतनावर 90 फायरमनची भरती

NMC Fireman Recruitment
NMC Fireman Recruitmentesakal
Updated on

NMC Fireman Recruitment : महापालिकेत अत्यावश्‍यक सेवेत गणल्या जाणाऱ्या अग्निशमन विभागात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.

त्यामुळे रिक्त जागांची कमतरता भरण्यासाठी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून फायरमन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा फायरमन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी असे एकूण नव्वद फायरमनची भरती विद्यावेतनावर केली जाणार आहे. (nmc Recruitment of 90 firemen on stipend nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

नाशिक महापालिकेच्या पहिल्या आकृतिबंधात फायरमन संवर्गात २९९ पदे मंजूर करण्यात आली आहे. निवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीमुळे सद्यःस्थितीत अवघे २८ फायरमन कार्यरत आहे. फायरमनची २७१ पदे रिक्त आहेत.

महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. शहराचा विस्तारदेखील वाढला आहे. इमारतींची संख्या व उंचीदेखील वाढत असल्याने त्याअनुषंगाने फायरमनची अधिक गरज भासणार आहे.

अपुरे मनुष्यबळ असल्याने अग्निशमन विभागाच्या सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सुदैवाने अद्यापपर्यंत दुर्दैवी घटना घडलेली नाही.

मात्र, भविष्यात अशी घटना घडल्यास अग्निशमन विभागाच्या रिक्त पदांचे पितळ बाहेर पडू शकते. कोविडकाळात राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून अत्यावश्‍यक सेवेतील वैद्यकीय व अग्निशमन या दोन विभागातील पदे तातडीने भरण्याच्या सूचना दिल्या.

NMC Fireman Recruitment
NMC News: ‘मनपाचा गोदाकिनारी स्वच्छोत्सव’! ‘इंडियन स्वच्छता लीग’च्या अनुषंगाने गोदाघाटावर विशेष स्वच्छता मोहीम

त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेने ‘टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस’ मार्फत पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. सदर प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या प्रक्रियेला किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

या दरम्यान फायरमनची गरज भागविण्यासाठी अग्निशमन विभागामध्ये ९० प्रशिक्षणार्थी फायरमन नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा फायरमन अभ्यासक्रम पूर्ण केलेले ४५ प्रशिक्षणार्थी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून फायरमन अभ्यास पूर्ण केलेले ४५ प्रशिक्षणार्थी असे एकूण ९० फायरमनची सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. त्यांना आठ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

NMC Fireman Recruitment
Aviral Godavari Activity: गोदावरी स्वच्छतेसाठी प्लास्टिक संकलन मोहीम; महात्मा गांधी जयंतीदिनी अविरल गोदावरी उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.