NMC Recruitment: रिक्तपदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ! वैद्यकीय, अग्निशमन पदे वर्षअखेर भरणार

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

नाशिक : महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील एकूण ७०६ पदांसाठी ‘टीसीएस’मार्फत रिक्तपदासह आरक्षणाची माहिती मागविण्यात आल्याने भरती प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे.

सोमवारी (ता. २०) यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे झालेल्या बैठकीनंतर डिसेंबरअखेर रिक्तपदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील वर्षात या दोन्ही विभागांचा कामकाजाचा भार कमी होणार आहे. (NMC Recruitment Vacancy Recruitment Process Begins Medical fire fighting posts will be filled by end of year nashik)

महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत. महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळालेला असल्याने १४ हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला.

मात्र अद्याप तो आराखडा मंजूर नाही. नियमित रिक्तपदे भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची अट टाकली. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्तपदांची भरती करू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत.

परंतु कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य, अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला.

परंतु भरती करताना शासन नियुक्त संस्थेमार्फत भरती कराव्यात, अशा स्पष्ट सूचना अध्यादेशामध्ये आहेत. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांच्या माध्यमातूनच भरती करता येणार आहे.

महापालिकेने दोन्ही कंपन्यांना सुरवातीला निमंत्रित केले. परंतु टीसीएसने नकार दिल्यानंतर आयबीपीएसने नोकर भरतीसाठी होकार कळविला, परंतु आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता आणि अटी व शर्थीचा विचार करता आयबीपीएस कंपनीला नकार देण्यात आला.

त्यानंतर टीसीएस कंपनीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. टीसीएस कंपनीसमवेत कराराचा अंतिम मसुदा तयार झाला. त्या मसुद्याला महासभेची मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर टीसीएससोबत करार करण्यात आला.

भरतीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे प्रोजेक्ट मॅनेजरकडून काम पूर्ण करण्यात आले. आगामी तीन वर्षासाठी हा करार असून आता कुठलीही भरती टीसीएसमार्फतच केली जाणार आहे.

NMC Nashik News
Pandit Dindayal Upadhyay Maharojgar Melawa: नागपूरच्या रोजगार मेळाव्‍यात सहभागाचे आवाहन

टीसीएस कंपनीच्या माध्यमातून भरती करताना एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे. दहा हजारापर्यंत परीक्षार्थी आल्यास एका उमेदवारासाठी ६७५ रुपये आर्थिक मोबदला कंपनीकडून आकारला जाणार आहे.

दहा हजार ते पन्नास हजार परीक्षार्थी आले तर एका उमेदवारासाठी सहाशे रुपये दर आकारला जाणार आहे.

एक लाखांपर्यंत परीक्षार्थी आल्यास प्रत्येक उमेदवार ५७५ रुपये असा दर आकारला जाईल दोन लाखांपर्यंत ५५० रुपये, पाच लाखांपर्यंत उमेदवार आल्यास ४७५ रुपये याप्रमाणे मोबदला द्यावा लागणार आहे.

‘ब’ व ‘ड’ संवर्गातील पदांची भरती

‘ब‘ ते ‘ड’ संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाणार आहे. अ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते.

त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता उर्वरित ६२४ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

भरतीसाठी लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. यासाठी संवर्गनिहाय परिक्षेचे स्वरूप, संवर्ग, आरक्षण यासंदर्भात टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधींची प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे झालेल्या बैठकीत भरती प्रक्रियेसंदर्भात माहिती घेण्यात आली. डिसेंबर अखेर किंवा पुढच्या वर्षाच्या सुरवातीला भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

"वैद्यकीय व अग्निशमन दलाच्या पदासंदर्भात टीसीएस अधिकाऱ्यांशी आज झालेल्या बैठकीनंतर आरक्षणाची माहिती घेण्यात आली. लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल."

- लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त, महापालिका.

NMC Nashik News
NMC News: गंजमाळ झोपडपट्टी खाली करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.