NMC News : पिंपरी- चिंचवड दुर्घटनेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने शहरातील होर्डिंग धारकांना स्थिरता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने २५ जूनपर्यंत ८०४ होर्डिंग धारकांनी प्रमाणपत्र सादर केले असून, ४१ होर्डिंग धारकांना दोन दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
दुसरीकडे मात्र ज्या होर्डिंगचे स्थिरता प्रमाणपत्र दाखल झाले आहे. त्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ऑडिट करणाऱ्या तीनही एजन्सींना पत्राद्वारे गोपनीय अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (NMC Revision of Hoardings Stability Certificate 41 hoarding holders 2 days deadline Nashik News)
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने महापालिकांना होर्डिंगचे स्टॅबिलिटी अर्थात स्थिरता प्रमाणपत्र तपासण्याच्या सूचना दिल्या.
नाशिक महापालिकेकडून ८४५ होर्डिंग धारकांना सूचना पाठवून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. २५ जूनपर्यंत त्याची मुदत होती, २४ जूनपर्यंत ८०४ होर्डिंग धारकांनी स्थिरता प्रमाणपत्र सादर केले.
स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सिव्हिल टेक, संदीप फाउंडेशन व टीबीटी महाविद्यालय या तीन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेने ४१ होर्डिंग धारकांना दोन दिवसांची मुदत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दिली आहे. तर, दुसरीकडे ज्या होर्डिंग धारकांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यांची फेरपडताळणी होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गोपनीय अहवालानंतर तपासणी
८४५ पैकी ८०४ होर्डिंग धारकांनी स्थिरता प्रमाणपत्र सादर केले आहे. ज्या होर्डिंगचे स्थिरता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. त्यांना दोन दिवसाची मुदत दिली असून, ज्या होर्डिंग धारकांनी प्रमाणपत्र सादर केले आहे.
त्याची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये किती होर्डिंग्सना दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती, प्रत्यक्षात पूर्तता केली आहे का, किती होर्डिंग धोकादायक आहेत, किती होर्डिंगची जागा बदलावी लागेल,
यासंदर्भातील गोपनीय अहवाल फेरपडताळणीच्या माध्यमातून सादर करण्याच्या सूचना नियुक्त केलेल्या एजन्सीला देण्यात आल्या आहेत. अशी माहिती महापालिकेचे विविध कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.