NMC Sewage Treatment Plant : औद्योगिक सांडपाण्यात केमिकल, जड घटक! महापालिकेच्या आऊटलेटला जोडण्यास नकार

NMC News
NMC News esakal
Updated on

NMC Sewage Treatment Plant : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला व महापालिका व एमआयडीसीकडून चालढकल होत असलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अमृत २ योजनेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला.

परंतु, औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर महापालिकेच्या आऊटलेटला जोडता येणार नाही, असे स्पष्ट मत महापालिकेने नोंदविले असून तसा अहवाल ‘निरी’ संस्थेला सादर केला जाणार आहे.

औद्योगिक सांडपाण्यात केमिकल घटक असल्याने त्याचा परिणाम घरगुती सांडपाण्यावर होऊन महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रावर होईल, असा दावा करण्यात आला आहे. (NMC Sewage Treatment Plant Chemicals heavy elements in industrial waste water Refusal to connect municipal outlet nashik news)

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा वापर होऊन तयार झालेल्या सांडपाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आहे.

परंतु औद्योगिक विकास मंडळाकडे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी अमृत-२ योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्योगमंत्र्यांनी दिल्या.

त्याअनुषंगाने महापालिकेकडून सल्लागार नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी २. १६ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्याचे आऊटलेट महापालिकेच्या वाहिन्यांना जोडण्यास महापालिकेने नकार कळविला आहे.

त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प झाला तरी प्रक्रियायुक्त पाणी कुठे सोडावे यावरून नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
NMC News : 8 वर्षांपासूनच्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम उघडण्याचा निर्णय

केमिकलयुक्त पाण्याचा परिणाम

औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निर्माण होणाऱ्या केंद्रात, तसेच पुढे प्रक्रियायुक्त पाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांना जोडण्याच्या सूचना आहेत. महापालिकेच्या वाहिन्यांना जोडल्यास त्याचा परिणाम मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतेवर होईल.

जैविक घटकांवर परिणाम होईल. औद्योगिक सांडपाण्यात केमिकलयुक्त, जडधातू असल्याने गुणवत्तेवर परिणाम होतील. मलजलवाहिनीला जोडल्या जाणारे औद्योगिक सांडपाण्यात सल्फेटचे उच्च प्रमाण असते.

या सल्फेटचे सल्फाईडमध्ये रूपांतर होऊन हायड्रोजन सल्फाईड तयार होईल. परिणामी सीवर नेटवर्क पाइपलाइन खराब होऊ शकतात.

NMC News
NMC News : शहराला कोणी वाली आहे का? ना प्रशासन प्रमुख, ना लोकप्रतिनिधी; तक्रारींचा ढिग!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.