NMC Simhastha Plan : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठीचा ‘नमामि गोदा’ योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑगस्ट महिन्याअखेर राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली. (NMC Simhastha Plan Namami Goda project report to submitted by end of August nashik news)
वाराणसी येथील गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नमामि गंगा प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्याच धर्तीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविला जाणार आहे. प्रकल्प राबविण्यासाठी गोदावरी व उपनद्यांच्या काठावरील मलवाहिकांची क्षमतावाढ व सुधारणा करणे,
नदीमध्ये मिसळणारे मलजल अडवून मलनिस्सारण केंद्रांकडे वळविणे, मखमलाबाद व कामटवाडे येथे नवीन मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे, नव्याने विकसित होत असलेल्या रहिवासी भागात मलवाहिकांचे जाळे निर्माण करणे,
नदीघाटाचे सुशोभीकरण तसेच संवर्धन, नूतनीकरण करणे, मलजल प्रक्रिया केंद्रातील प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करणे आदी महत्त्वाच्या कामांचा ‘नमामि गोदा’ प्रकल्पात समावेश आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. ‘नमामि गोदा’ प्रकल्पाची अंमलबजावणी करताना सिवेज ऑडिट देखील केले जाणार आहे.
याअंतर्गत पाणीपुरवठा, मलजल, मलनिस्सारण केंद्रांमध्ये प्रक्रिया होणारे मलजलाचा अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे. प्रकल्प अहवाल ऑगस्ट अखेर अंतिम करून शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे अशी माहिती अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.
पुनरुज्जीवनाचा नमामी गोदा प्रकल्पात समावेश
गोदावरी या प्रमुख नदी सह वाघाडी (वरुणा), नंदिनी, वालदेवी, कपिला या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.