Nashik : पावसाळ्यापूर्वीच 60 ठिकाणी विशेष नियोजन

NMC
NMCesakal
Updated on

नाशिक : पावसाळा तोंडावर आल्याने महापालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (NMC Disaster Management System) सक्रिय झाली आहे. पावसाळ्यात (Monsoon) पाणी साठणाऱ्या ६० ठिकाणी उपाययोजनांची तयारी करीत नाशिक पूर्व विभागाने (Nashik East Division) नियोजनात आघाडी घेतली आहे. अतिरिक्त आयुक्‍त (additional Commissioner) अशोक अत्राम यांनी आठवडाभरात पूरस्थिती उद्भवणाऱ्या भागात दौरा करून माहिती घेणार असल्याचे सांगितले. महापालिकेतर्फे शहरातील सहाही विभागात आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत केले जाणार आहे. शहरात पुराचा सर्वाधिक फटका नाशिक पूर्व आणि नाशिक रोड विभागाला बसतो. गोदावरीच्या पुराची पातळी वाढल्याने बाराशेहून अधिक लोक पूर्व विभागात विस्थापित होतात. तर, एकावेळी गोदावरी, दारणा, वालदेवी नंदिनी अशा चारही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर त्याचा फटका नाशिक रोडला विभागाला बसतो. (NMC Special planning at 60 places before monsoon Nashik News)

साहित्याची जमवाजमव

पुराला तोंड देण्यासाठी पूर्व विभागाची तयारी पूर्णत्वास आली आहे. पूर्व विभागात टाळकुटेश्वर, दूध बाजार, अमरधाम रोड यासह काझी गढी भागात पुराचा फटका बसत असल्याने पूर स्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेने बागवानपुरा शाळा, नागझरी शाळा, मानूर रोड समाजमंदिर येथे पूरग्रस्तांसाठी आश्रयाची सोय केली आहे. पूर स्थितीला तोंड देण्यासाठी जेसीबी, जेट मशिन, ट्रॅक्टर, मिनी ट्रक, जीप, एक बोट, इलेक्ट्रिक जनरेटर, प्लेटिंग, एक्स मेटसेट, वॉकीटॉकी, लाइफ रिंग, लाइफ जॅकेट, पोहणारे, दोर, कलेक्ट्रीक बिचिंग, बोल्ड कटर, जॅक, टामी, विळा, कोयता, व्हील पान्हा, घन, पहार, स्टील कटर, काँक्रिट कटर, बॅटरी, रबरी हॅण्डग्लोज, यासह ड्रेनेज चोक काढण्यासाठी यंत्रणेची साधन- सामुग्रीपर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर प्रकारच्या साहित्याची तयारी केली आहे.

NMC
मध्यस्थी अंगलट आली; गाडी एकाची, मध्यस्थी दुसऱ्याची, मनस्ताप भलत्यांनाच

गैरसोयीची ठिकाणे

नाशिक- पुणे महामार्गावर बोधलेनगर परिसरासह जुने नाशिक भागात सारडा सर्कल, जिन मंजिल चौक, दूध बाजार, वीज सावरकर चौक, डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटल चौक, अमरधाम रोड, संत सावतामाळी उद्यान, बनकर चौक, हरी मंजिल सोसायटी, द्वारकाधीश सोसायटी, धवलगिरी गार्डन परिसर, ओंकार कॉलनी, वडाळा रोड, पखाल रोड, गणेश पार्क परिसर, लेवा समाज मंगल कार्यालय, बोधलेनगर वखार, दत्तमंदिर शिवाजीनगर, रामदास स्वामिनगर, सूर्यकलम सोसायटी, प्रभाग सोळा म्हसोबा मंदिर, जनता शाळा, तपोवन रोड, इराणी इस्टेट, वडाळा रोड, शिवाजीवाडी पूल, पूजा अपार्टमेंट, वज्रराज सोसायटी, सिटी गार्डन रोड, वडाळा चौक, आयटीआय कॉम्प्लेक्स रोड, आंबेडकरनगर स्टॉप समोर, सिध्दार्थ हॉटेल परिसर, उपनगर परिसरात वैभव कॉलनी, नळे मळा, शिव कॉलनी, श्रध्दाविहार, एचपी गॅस गोडाऊन, महारुद्र कॉलनी एलआयसी कॉलनी, साठेनगर, श्रीकृष्ण कॉलनी, पांडवनगरी आदींसह ६० ते ६२ ठिकाणी पावसाळ्यात पूरस्थिती गंभीर होते.

NMC
Nashik : शहरात नाले सफाईला गती

"पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील सहाही विभागांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्यासह पूरस्थितीला तोंड देण्याचे नियोजन केले आहे. पूर्व विभागाचे नियोजन पूर्णत्वास आले आहे. येत्या काही दिवसांत इतर विभागाची तयारी पूर्ण होईल. त्यानंतर धोकादायक ठिकाणी फिरून तेथील स्थितीची माहिती घेणार आहे." - अशोक अत्राम, अतिरिक्त आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.