NMC News: महापालिकेचा आकृतिबंध 9 हजाराच्या आत

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News: राज्य शासनाने महसुली खर्चाची अट शिथिल केल्यानंतर महापालिकेकडून रिक्त पदांचा सुधारित आराखडा तयार करताना ९ हजाराच्या आत पदांचा आराखडा तयार करण्यासाठी काम सुरू केले आहे.

यापूर्वी राज्य शासनाला जवळपास १४ हजार पदांचा आराखडा सादर केला आहे. आराखडा छाननी समितीने आकृतिबंधाची छाननी केली. ४९ पैकी १५ विभागांची छाननी प्रक्रिया पार पडली. (nmc started to Work prepare plan of posts within 9 thousand nashik news)

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर लोकसंख्येनुसार पदांचा पहिला आराखडा तयार करण्यात आला. १९९५ मध्ये विविध संवर्गातील ७०९२ पदांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शहराची वाढती लोकसंख्या व महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जवळपास १४ हजार पदांचा आकृतिबंध ४ जानेवारी २०१७ मध्ये शासनाला सादर करण्यात आला.

२ नोव्हेबर २०१८ ला महापालिकेकडून राज्य शासनाने स्वंयस्पष्टता अहवाल मागितला. १२ जून २०१९ ला शासनाला स्वंयस्पष्टता अहवाल सादर करण्यात आला. शासनाच्या नगरविकास विभागाने १६ एप्रिल २०२१ ला ६०५ नवीन पदांना मान्यता दिली. त्याचबरोबर पदांचा नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ४९ विभागांकडून आस्थापनेवरील मंजूर पदे, आवश्‍यक असलेली पदे व संवर्गनिहाय पदांची माहिती एकत्रीकरणाचे काम करण्यात आले.

अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा हजार पदांचा आकृतिबंध तयार झाला. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी ९ हजाराच्या आत आकृतिबंध आणण्याच्या सूचना दिल्या. आकृतिबंध चौकटीत व वास्तवदर्शक करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठित केली.

NMC Nashik News
Sakal Exclusive: राज्यात 1 कोटी रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे' अभियान

समितीत मंगळवारी (ता. ५) प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या उपस्थितीत ४९ पैकी १५ विभागांची छाननी करण्यात आली. तांत्रिक संवर्गातील बांधकाम, नगररचना, मिळकत, उद्यान, गोदावरी संवर्धन कक्ष आदी विभागांच्या पदांची छाननी करण्यात आली.

३५ टक्क्यांची अट शिथिल

राज्यातील महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर ताण निर्माण झाला आहे. त्याशिवाय नागरिकांची दैनंदिन कामे मंदावली आहेत. त्यामुळे राज्य शासनाने आकृतिबंधासाठी ३५ टक्क्यांची अट शिथिल केली आहे. त्यानुसार नवीन सुधारित आकृतिबंध तयार करण्याचे काम सुरू आहे. नवीन सुधारित आकृतिबंध तयार करताना नऊ हजाराच्या आत आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत.

"सुधारित आकृतिबंध तयार करताना नऊ हजारांच्या आत पदे आणली जात आहे. त्यासाठी छाननी समितीकडून छाननीचे काम सुरू आहे. ४९ पैकी १५ विभागांची छाननी झाली." - लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त, प्रशासन.

NMC Nashik News
Nashik Kalyan Local News: इन्स्पेक्शनवरच कल्याण लोकलचे भवितव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.