NMC News : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत.
सदर ‘स्वच्छता पंधरवडा’ विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. (NMC Swachhotsav at godavari river shore Special cleanliness drive at Godaghat in association with Indian Swachhta League nashik)
‘इंडियन स्वच्छता लीग’ हा या उपक्रमाचा एक भाग आहे. नाशिक मनपाने नाशिक झिलर्स या संघासह ‘इंडियन स्वच्छता लीग’मध्ये सहभाग नोंदविला असून, प्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर मनपाच्या संघाचे कर्णधारपद भूषवित आहेत.
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संबंधित उपक्रमाच्या अनुषंगाने आज पंचवटीतील गौरी पटांगण या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
स्वच्छता मोहिमेस मनपा संघाचा कर्णधार चिन्मय उदगीरकर, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. कल्पना कुटे, उपायुक्त प्रशांत पाटील, विभागीय अधिकारी योगेश रकटे, कार्यकारी अभियंता मैड, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता घोलप, अभिनेते किरण भालेराव, स्वच्छताप्रेमी राजेश पंडित, चंदू पाटील व मनपाचे सहा विभागातील स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
स्वच्छता मोहिमेत मनपासह शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, स्वयंसेवक स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग नोंदविला.
या वेळी संपूर्ण गोदावरी नदीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच परिसरातील प्लॅस्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला.
या वेळी चिन्मय उदगीरकर यांच्याकडून उपस्थित पाचशे स्वयंसेवक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छताविषयक मार्गदर्शन करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.