NMC Tax Recovery : पन्नास हजारांच्या पुढील थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजणार!

NMC News
NMC News esakal
Updated on

नाशिक : ऑक्टोबर महिन्यात थकबाकीदारांकडून थकीत कर वसूल करण्यासाठी महापालिकेने ढोल बजाव मोहीम राबविल्याने या माध्यमातून दहा कोटी रुपये थकबाकी वसूल झाल्यानंतर आता पुढील वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ५० हजार रुपयांवरील थकबाकीदार असलेल्या महापालिकेच्या थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजवून वसुली केली जाणार आहे. (NMC Tax Recovery dhol bajao front of door of next defaulters of fifty thousand Nashik News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

NMC News
Cotton News : कापसाचा साठा केल्याने झाला वांधा; जिनींग प्रेसिंग मिल बंद ठेवण्याची वेळ

महापालिकेत घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी वर्षागणिक वाढत आहे. सध्या थकबाकी ५०० कोटींच्या वर पोचली आहे. सध्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वसुलीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांच्या आहे. ऑक्टोबर महिन्यात पालिकेचा आर्थिक गाडा कोसळेल असा अंदाज होता. त्या अनुषंगाने विविध विभागाकडे थकबाकी वसूल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार २५ हजार रुपयांच्या पुढे थकबाकी असलेल्या नागरिक तसेच संस्थांच्या दारासमोर ढोल वाजवण्याची मोहीम राबविण्यात आली. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर अशा १९ दिवसांच्या मुदतीत सहा कोटी रुपये थकबाकी वसूल झाली. परंतु, थकबाकी वसूल करताना राजकीय अडथळे निर्माण झाल्याने मोहीम बंद करण्यात आली. मात्र महापालिकेचा आर्थिक गाडा चालवायचा असेल तर थकबाकी वसूल होणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ५० हजार पुढील थकबाकी असलेल्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. थकबाकी वसूल न झाल्यास थकबाकीदाराची मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

NMC News
Dhule News : समस्यांमुळे यंत्रणा रोजच खाते धुळेकरांचे ‘शिव्याशाप'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.