NMC Tax Recovery : घरपट्टीची शंभर टक्के वसुली होण्यासाठी महापालिकेच्या विविध कर विभागाकडून एप्रिल महिन्यात एकूण रक्कम आगाऊ भरल्यास आठ टक्के सवलत दिली जात आहे.
त्याअनुषंगाने आतापर्यंत महिन्याभरात ४५ कोटी रुपये महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. नागरिकांना सुटीच्या दिवशी अडचण होऊ नये, म्हणून शनिवार (ता. २९) पासून पुढील दोन या सुटीच्या दिवशीदेखील घरपट्टीचे कार्यालय खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (NMC Tax Recovery payment office open even on holidays nashik news)
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
यंदा घरपट्टीची विक्रमी १८६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांमध्ये घरपट्टीचा अपेक्षित टप्पा गाठण्यासाठी महापालिकेच्या वतीने एप्रिल मे व जून महिन्यात मोठी सवलत जाहीर करण्यात आली.
एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत आगाऊ एक रक्कम घरपट्टी अदा केल्यास आठ टक्के, तर मे महिन्यात पाच टक्के व जून महिन्यात तीन टक्के सवलत दिली जात आहे. आठ टक्के सवलत योजनेला दोन दिवस शिल्लक राहिले आहे.
परंतु या दोन दिवसात शनिवार व रविवार अशी सुटी लागून आली आहे. त्याचबरोबर सोमवारी १ मे या कामगार दिनाचीदेखील सुटी असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुटीच्या दिवशीदेखील कर भरण्यासाठी कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.