NMC Water Bill Recovery: अवघ्या 15 दिवसातच आनंदावर विरजण! पाणीपट्टीत नीचांकी वसुली

NMC water supply
NMC water supplyesakal
Updated on

NMC Water Bill Recovery : आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घरपट्टीची विक्रमी वसुली केल्याची पाठ विविध कर विभागाकडून थोपटली जात असली तरी पाणीपट्टीत मात्र नीचांकी वसुली झाल्याने अवघ्या पंधरा दिवसातच आनंदावर विरजण पडले आहे.

मागील चार महिन्यात ११ कोटी ८१ लाख रुपये वसूल झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एक कोटी ९१ लाख रुपये एवढीच पाणीपट्टी वसुली झाली आहे. उर्वरित नऊ कोटी ७७ लाख रुपये ही मागील थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. (NMC water bill recovery in just 15 days Minimum recovery from catchment 9 crore 77 lakh arrears nashik)

नाशिक महापालिकेकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यात विशेष सवलत योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला घरपट्टीतून ९० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

महापालिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच विक्रमी वसुली झाल्याने विविध कर विभागाच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेतली गेली. मात्र पाणीपट्टी वसुलीची आकडेवारी बघता या आनंदावर विरजण पडले आहे.

चालू आर्थिक वर्षात ७५ कोटी रुपयांची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. यापैकी पहिल्या साडेतीन महिन्यात अवघे एक कोटी ९१ लाख रुपयांची वसुली झाली. पश्चिम विभागातून पाच लाख १४ हजार, पूर्व विभागातून ९ लाख ६४ हजार, सातपूर विभागातून २३ लाख ६ हजार, नाशिक रोड विभागातून २९ लाख ३३ हजार, तर पंचवटी विभागातून ३१ लाख ६३ हजार रुपयांची वसुली झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC water supply
NMC Water Supply: पाणीपुरवठा विभाग धरणात चर खोदणार

सिडको विभागातून ९२ लाख ४५ हजार रुपये घरपट्टीच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे. सर्वात कमी वसुली पश्चिम विभागातून झाली आहे. पश्चिम विभागात शहराची महत्त्वाची बाजारपेठ व श्रीमंत वर्गाची मोठी वस्ती आहे. असे असतानाही या भागातून पाणीपट्टीची कमी वसुली झाली.

देयके वाटप न झाल्याने अडचण

घरपट्टीची देयके नागरिकांना प्राप्त झाली, तसेच महापालिकेच्या वेबसाइटवरूनदेखील देयके प्राप्त करून घेण्याची सोय आहे. मात्र पाणीपट्टीची देयके नागरिकांना मिळण्याची सोय नाही.

महापालिकेकडे कर्मचारी वर्गदेखील अपुरा असल्याने पाणीपट्टीची देयके वेळेत नागरिकांना प्राप्त होत नाही. त्याचा परिणाम पाणीपट्टी वसुलीवर झाला आहे. त्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टी नागरिकांना वेळेत हाती मिळावी यासाठी बाह्य एजन्सी नियुक्त करावी, अशी मागणी होत आहे.

NMC water supply
NMC News: 2 महिने उलटले तरी घंटागाडी चौकशीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात! कारवाईची प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.