NMC Water Reduction : पाणीकपात नेमकी कोणासाठी? राजकारण पेटले; औरंगाबादसाठी पाणीकपात करण्याचा संशय

Water Reduction
Water Reductionesakal
Updated on

NMC Water Reduction : दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ‘अल निनो’ वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मॉन्सून लांबणीवर पडण्यात होणार आहे. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरण्यासाठी महापालिकेकडून पाणीकपातीचे नियोजन सुरू आहे.

परंतु उपलब्ध पाणी साठ्याचा विचार करता पाणी बचतीचा नाशिककरांना उपयोग होणार नाही. त्यामुळे पाणी बचत नेमकी कोणासाठी होतेय यावरून राजकारण पेटले आहे. औरंगाबादसाठी नाशिकमध्ये पाणी कपात करण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (NMC Water reduction for whom exactly Suspicion of water cut for Aurangabad nashik news)

शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणे फुल्ल आहेत. परंतु, हवामानशास्त्र विभागाने दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ‘अल निनो’ वादळ निर्माण होईल, अशी दाट शक्यता वर्तविली.

त्यामुळे राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१ जुलै ऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरण्याचा सल्ला देताना पाणीटंचाई आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. नाशिक महापालिकेने आराखडा सादर करताना एप्रिल महिन्यात आठ दिवसातून एक दिवस जून व जुलै महिन्यात आठ दिवसातून दोनदा पाणी कपात करण्याचे नियोजन केले.

सद्य:स्थितीत नियोजनासंदर्भात विभागीय आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असून विभागीय आयुक्तांनी २१ एप्रिलला महापालिकेला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. परंतु पाणी कपातीला जोरदार विरोध सुरू झाला असून अधिकारी वर्गदेखील पाणी कपातीवरून अवाक झाला आहे.

धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. अगदी ऑगस्ट अखेरपर्यंत पाऊस पडला नाही तरी धरणातील पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत करून महापालिका काय साध्य करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Water Reduction
NMC Heatstroke Plan : उष्माघाताच्या धास्तीने महापालिका ॲक्शन मोडवर! सरकारी रुग्णालयात 20 खाटा आरक्षित

तर जायकवाडीची सोय

महापालिकेने पाणी बचत केली तर धरणात पाणी साठून राहील. जायकवाडीचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ते पाणी आवर्तनाच्या रूपाने पुढे सोडले जाईल. त्याशिवाय पाच टीएमसी पाणी सोडले तर उष्णतेमुळे जेमतेम तीन टीएमसी पाणी पोचणार आहे. दोन टीएमसी पाणी वाया जाणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत रोजच्या इतकाच पाणी पुरवठा नाशिक मध्ये व्हावा अशी मागणी आहे.

धरणात अस्तित्वात असलेला पाणीसाठा

गंगापूर धरण समूहात पाच दशलक्ष घनफूट (टीएमसी) तर दारणा धरणाचा समूहात नऊ टीएमसी असे एकूण १४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. शहरासाठी ऑगस्टअखेरपर्यंत २.६ टीएमसी पाणी लागणार आहे.

सिंचनासाठी चार आवर्तने सोडल्यास १.२ टीएमसी पाणी उपलब्ध होईल. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा एकत्रित विचार केला तरी एकूण ३.८ टीएमसी पाणी ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत लागणार असल्याने दहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत नेमकी कोणासाठी करायची असा प्रश्न उपस्थित होतो.

"धरणातील पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही महापालिकेला कपात करण्यास भाग पाडले जात असल्याचा संशय आहे. पिण्यासाठी, सिंचन नंतर औद्योगिक या प्रमाणे पाणी राखून ठेवले जाते. मुबलक पाणीसाठा असतानाही जलसंपदा विभाग महापालिकेची दिशाभूल करते आहे. महापालिकेने जलसंपदा खात्याशी पत्रव्यवहार करून वाढीव पाण्याचे नियोजन करण्यास भाग पाडावे."

- सुधाकर बडगुजर, माजी विरोधी पक्षनेते महापालिका.

Water Reduction
NMC Simhastha Plan : ऑगस्ट महिन्याअखेर सादर होणार ‘नमामि गोदा’ प्रकल्प अहवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.