NMC Water Shortage Plan: विभागनिहाय प्रत्येकी 3 टँकर; पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू

NMC Water Shortage Plan
NMC Water Shortage Planesakal
Updated on

NMC Water Shortage Plan : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या मध्य भागापर्यंत चर खोदण्याच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आल्यानंतर आता संभावित पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यानुसार विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे अठरा टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. (NMC Water Shortage Plan 3 tankers each division wise Implementation of Water Scarcity Action Plan started nashik news)

दक्षिण पॅसिफिक समुद्रात अल निओ वादळाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने हवामान विभागाने केंद्र सरकारला व केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळा लांबणार असल्याने यापूर्वीच नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

नाशिक महापालिकेने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करताना एप्रिल महिन्यात आठवड्यातून एक दिवस, तर जून महिन्यापासून आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचे नियोजन केले.

शासनाने विभागीय आयुक्तांना परिस्थिती बघून पाणी कपातीचा निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु धरणात पाणीसाठा असल्याने अद्यापपर्यंत नाशिककरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागले नाही. सद्यःस्थितीत धरणाची पाणी पातळी सहाशे मीटरपर्यंत आली आहे.

तीच पाण्याची पातळी ५९८ मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातील पाणी जॅकवेलपर्यंत येण्यात अडथळा निर्माण होईल. टणक खडक फोडून चर खोदावी लागणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांनी तूर्त स्थगिती दिली आहे. असे असले तरी पाणीपुरवठा विभागाने लांबणीवर पडणारा पावसाळा लक्षात घेऊन पाणी टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

त्यात विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा विभागात एकूण अठरा पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. त्या व्यतिरिक्त महापालिकेचे विभागनिहाय सहा टँकर आहे.

खासगी विहीरी अधिग्रहीत

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १६० खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याची नियोजन आहे. महापालिकेच्या एक हजार १८९ विंधन विहिरींची दुरुस्ती केली जाणार आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या मालकीच्या ३१ विहिरी स्वच्छ करण्याबरोबरच आवश्‍यकता भासल्यास खासगी विहिरीदेखील ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे.

"गंगापूर धरणात चर खोदण्याच्या विषयाला स्थगिती देण्यात आली आहे. शहरात विभागनिहाय प्रत्येकी तीन टँकरचे नियोजन सुरू आहे. परंतु ही फक्त तयारी आहे. धरणात पाणीसाठा आहे. तातडीची बाब म्हणून सोय करण्यात आली आहे."

- अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()