NMC Water Supply : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सद्य:स्थितीमध्ये ३३ टक्के पाणीसाठा असताना महापालिकेने या परिस्थितीतही धरणात चर खोदण्याची तयारी केली असून चर खोदण्यासाठी एका मक्तेदार कंपनीकडून देकार मागविण्यात आले आहे.
वास्तविक चर खोदण्याचे काम उन्हाळ्यात होणे अपेक्षित असताना आता पावसाळा सुरू झाल्याने या काळात काम होऊ शकत नाही मात्र पाणीपुरवठा विभागाने मागविलेल्या देकारमुळे या विभागाच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. (NMC water supply department will dig trenches in dam nashik)
राज्य शासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या होत्या, त्या अनुषंगाने नाशिक महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. नियोजनात एक वेळ पाणी कपातीचे नियोजन होते.
परंतु धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने व नाशिकला अतिरिक्त पाणी आरक्षित करण्यात आल्याने पाणी कपात झाली नाही त्यामुळे पाणीटंचाईतून नाशिककरांची सुटका झाली. परंतु दुसरीकडे गंगापूर धरणात खोलवर चर खोदून सदरचे पाणी इंटेकवेल पर्यंत आणण्याचे नियोजन महापालिकेने केले होते.
परंतु चर खोदण्याचे काम जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही किंवा धरणातील पाणी खोलवर जाते त्याच वेळेस करणे आवश्यक होते. परंतु महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणात पाण्याची पातळी वाढत असताना चर खोदण्याचे काम सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यासाठी महापालिकेने स्वारस्य देकार मागविले, त्यात ॲक्वा या मक्तेदार कंपनीचा देकार महापालिकेला प्राप्त झाला आहे. गंगापूर धरणात चर खोदण्याला माजी महापौर दशरथ पाटील यांनी विरोध केला आहे.
"पाऊस लांबण्याच्या तसेच, धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या मध्यभागातील पाणी लिफ्ट करून जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता पावसाळा सुरू झाल्याने व धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने आवश्यकता नाही."
- उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.