Nashik : करवसुलीसाठी NMC दसऱ्यानंतर वाजवणार ढोल

NMC Nashik news
NMC Nashik newsesakal
Updated on

नाशिक : महापालिका विजयादशमीनंतर घर व पाणीपट्टी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल ताशा वाजवणार असून, मोहिमेसाठी जवळपास अठरा लाख रुपये इतका खर्च येणार आहे. महापालिका प्रत्येक विभागात दोन ढोल व एक ताशा वादक नेमणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. (NMC will beat the drum after Dussehra for tax collection Nashik Latest Marathi News)

NMC Nashik news
नाशिक : 4 महिन्यापूर्वी झालेला रस्ता खचल्याने अपघात

प्रत्येक विभागासाठी तीन लाख रुपये खर्च अपेक्षित असून सहा विभागाचा विचार करता ढोल ताशा वाजवण्यावर साधारण: अठरा लाख खर्च होणार आहे. थकीत घरपट्टीची रक्कम ६१ कोटी तर पाणीपट्टी थकबाकी ३५ कोटी इतकी आहे. दरम्यान, थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्यासाठी महापालिका प्रशासनाने विजयादशमीनंतरचा मुहूर्त निवडला आहे.

मागील काळात संकलन विभागाचे घर व पाणी वसुलीकडे दुर्लक्ष झाले होते. त्याचा फायदा घेत अनेकांनी बिल भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे थकबाकीचा आकडा कोट्यवधीचा घरात पोचला. महापालिका प्रशासन वेळोवेळी आवाहन करूनही थकबाकीदार भरणा करत नसल्याने महापालिकेने बड्या थकबाकीदारांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या घरासमोर ढोल वाजवणार आहे.

त्यासाठी सहाही विभागात दोन ढोल व एक ताशा वाजविणारे पथक असणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. घरासमोर ढोल वाजल्यास इज्जतीचा पंचनामा होईल या भितीपोटी तरी थकबाकीदार स्वतःहून पुढे येत भरणा करतील, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. कर संकलन विभाग महापालिका संकेतस्थळावर थकबाकीदारांसाठी अंतिम नोटीस प्रसिद्ध करणार आहे. तरीदेखील थकबाकीदारांनी घर व पाणीपट्टी भरण्याकडे पाठ फिरवली तर विजयादशमीनंतर त्यांच्या घरासमोर ढोल व ताशे वाजवले जाणार आहे.

NMC Nashik news
‘लम्पी’वर रामबाण उपाय कडुनिंबाचा धूर! घाबरू नका, काळजी घ्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.