Nashik News : NMC करणार 6 रोबोट यंत्र खरेदी

NMC Latest Nashik news
NMC Latest Nashik newsesakal
Updated on

नाशिक : चेंबरमध्ये गुदमरून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत असलेल्या घटनांची दखल घेत केंद्र सरकारने मलवाहिकांच्या स्वच्छतेसाठी यंत्राचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महापालिका सहा विभागात प्रत्येकी एक रोबोट यंत्र खरेदी करणार असून, त्यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी मिळणार आहे. (NMC will buy 6 robot machines Nashik News)

चेंबरमध्ये गुदमरून स्वच्छता कर्मचारी मृत होत असल्याच्या घटना देशभर घडत आहे. नाशिक महापालिका हद्दीतदेखील चेंबरमध्ये गुदमरून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या. आनंदवली येथे २०१६ मध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती.

त्या पाठोपाठ सातपूरच्या श्री साईश कंपनीतदेखील सेफ्टी टॅन्क स्वच्छ करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने डोक्यावरून मैला वाहण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील मलवाहिका स्वच्छ करू नये, असे स्पष्ट आदेशित केले आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

NMC Latest Nashik news
Dhule News : ध्येयवेडा ‘तो’ निघाला एव्हरेस्ट सर करायला!

त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने मलवाहिकांच्या स्वच्छतेसाठी रोबोट मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी प्राप्त होणार आहे. मलवाहिकांच्या स्वच्छतेसाठी सहा विभागात प्रत्येकी एक असे सहा रोबोट यंत्रे खरेदी केले जाणार आहे.

त्यासंदर्भातील प्रस्ताव मलनिस्सारण विभागाने घन व्यवस्थापन विभागाला दिल्या. २०१४ मध्ये दोन रोबोटिक यंत्र खरेदी करण्यात आली होती. त्या माध्यमातून नाले व गोदावरीच्या उपनद्या साफसफाईचे काम होत आहे. आता केंद्र सरकारच्या सूचनेवरून मलवाहिकांच्या स्वच्छतेसाठी रोबोट यंत्राचा वापर केला जाणार आहे.

NMC Latest Nashik news
Nashik News : संपूर्ण बाजारपेठेवर पोलिसांची तीक्ष्ण नजर! गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस कॅमेरा’ उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()