NMC News : सुशिक्षित बेरोजगारांना महापालिका देणार गाळे! कर विभागाकडून जप्ती मोहीम; अटी शर्तींवर होणार हस्तांतरित

Nashik News : थकबाकी अदा न केल्यास जप्ती व जप्तीनंतरही थकबाकी अदा न केल्यास सुशिक्षित बेरोजगारांना जप्त केलेले गाळे व्यवसायासाठी नियम व अटी शर्तींवर हस्तांतरित केले जाणार आहे.
NMC News
NMC Newsesakal
Updated on

नाशिक : मार्चअखेर पार्श्‍वभूमीवर गाळेधारकांकडील थकबाकी वसुली करण्यासाठी महापालिकेच्या कर विभागाने कंबर कसली असून थकबाकीचे ४२ कोटी रुपये वसुल करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकी अदा न केल्यास जप्ती व जप्तीनंतरही थकबाकी अदा न केल्यास सुशिक्षित बेरोजगारांना जप्त केलेले गाळे व्यवसायासाठी नियम व अटी शर्तींवर हस्तांतरित केले जाणार आहे. (NMC will give money to educated unemployed news)

महापालिकेच्या विविध व्यापारी संकुलामध्ये एकूण २९४४ गाळे आहे. या गाळ्यांना २०१७ पासून रेडीरेकनर दरानुसार भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेडीरेकनरच्या आठ टक्के किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती जो अधिकार अधिक दर ठरवेल त्यानुसार भाडेमूल्य निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी रेडीरेकनरच्या दरानुसार भाडेमूल्य निश्चित केले.

परिणामी व्यावसायिक गाळ्यांच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गाळेधारकांनी करार संपल्यानंतर म्हणजेच जानेवारी २०१७ पासून दरवाढ लागू करावी, अशी मागणी केली. या विरोधात न्यायालयात दावादेखील दाखल करण्यात आला. तेव्हापासून गाळेधारकांनी भाडे करारातील वाढीव रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे आत्तापर्यंत ४२ कोटींवर थकबाकीचा आकडा पोचला आहे.

अवघे १९७ कोटी वसूल

आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास दोन दिवस शिल्लक आहे. सुटीचे दिवस असले तरी कर भरण्यासाठी महापालिकेचे कार्यालय खुली आहेत. विविध कर विभागाला २१० कोटी रुपयांचे कर वसुलीचे उद्दिष्ट आहे, परंतु आत्तापर्यंत अवघे १९७ कोटी रुपये महसूल वसूल झाला आहे.

उर्वरित वसुली करण्यासाठी विविध कर विभागाने व्यापारी संकुले, भाजी मार्केट, खोका मार्केट तसेच अन्य गाळेधारकांकडे असलेली ४२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी दीड हजार थकबाकीदार गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. पश्चिम विभागातील गाळेधारकांकडे २४ कोटी तीन लाख रुपयांची थकबाकी आहे.  (latest marathi news)

NMC News
NMC News : महापालिकेच्या ‘जम्पिंग प्रमोशन’ची चौकशी; नगरविकास खात्याने मागविला वस्तुनिष्ठ अहवाल

नाशिक रोड विभागात पाच कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. पूर्व विभागात ५ कोटी ५१ लाख रुपये, तर सातपूर विभागात ४ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. पंचवटी विभागात १ कोटी ८० लाख, तर सिडको विभागात १ कोटी २९ लाख रुपये गाळेधारकांकडे भाडे थकलेले आहे. थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्यात आली असून, ३१ मार्चपर्यंत त्यांच्याकडून थकबाकीची रक्कम येणे अपेक्षित आहे.

दीड हजार थकबाकीदारांना नोटीस

४२ कोटी ७५ लाख रुपये वसूल करण्यासाठी जवळपास दीड हजार थकबाकीदार गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जे गाळेधारक थकबाकीची रक्कम अदा करणार नाही, त्यांच्याकडून गाळे जप्त केले जाणार आहेत.

जप्तीनंतरही थकबाकी अदा ना केल्यास जप्त केलेल्या गाळ्यांचा लिलाव करून सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी नियम व अटींवर हस्तांतरित केले जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली.

"आर्थिक वर्ष संपत असताना थकबाकीदारांनी थकबाकीची रक्कम अदा करणे अपेक्षित आहे. अन्यथा नाइलाजाने गाळे जप्तीची कारवाई करावी लागेल."

- विवेक भदाणे, उपायुक्त, विविध कर विभाग.

NMC News
NMC News : होर्डिंग घोटाळ्याचा अहवाल नव्हे, अभिप्राय; संघटना न्यायालयात जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.