NMC News: रिक्तपद भरती प्रश्नपत्रिकेचे महापालिका करणार अवलोकन

महापालिकेने अवलोकन केल्यानंतर त्रुटी दुरुस्त करून प्रश्नपत्रिका अंतिम केली जाणार आहे.
NMC News
NMC Newsesakal
Updated on

नाशिक : महापालिकेकडून वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ७०६ पदे भरली जाणार आहे. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, रिक्त पदे भरण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीने प्रश्नपत्रिका अंतिम केली आहे.

महापालिकेने अवलोकन केल्यानंतर त्रुटी दुरुस्त करून प्रश्नपत्रिका अंतिम केली जाणार आहे. (NMC will review vacancy recruitment question paper Nashik News)

नाशिक महापालिकेत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शासनाने विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर केली. त्यातील आता २८०० पदे रिक्त आहेत.

महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने १४००० पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर केला. परंतु त्या आराखड्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. दरम्यान कोविड काळामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासली.

NMC News
NMC News : भाडेतत्त्वावरील मिळकतींचा महापालिका घेणार शोध; उत्पन्नवाढीसाठी टोकाची भूमिका

त्यामुळे तातडीची बाब म्हणून महत्त्वाच्या खात्यांची पदे भरण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या. त्याअंतर्गत अग्निशमन व वैद्यकीय विभागातील एकूण ७०६ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेची नियुक्ती केली.

सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने पूर्ण केले असून आता प्रश्नपत्रिकेचे विविध नमुने तयार करण्यात आले आहेत. त्यातील एक नमुना प्रशासनाकडून अंतिम केला जाणार आहे.

NMC News
NMC News : नाशिक महापालिका पूर्व विभागात जन्मदर वाढला, मृत्यूदर घटला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.