NMC News: पीएम योजनेतून महापालिका घेणार इलेक्ट्रिक बसेस; शंभर ऐवजी पन्नास बसेसची खरेदी

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News : सिटीलिंक कंपनीचा वाढता तोटा लक्षात घेता पीएम ई बस योजनेतून शंभर ऐवजी पन्नास इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिली. (NMC will take electric buses from PM scheme Purchase of fifty buses instead of hundred nashik)

महापालिकेच्यावतीने ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ या तत्वावर बससेवा चालविली जाते. शहरात बससेवा सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात २०० सीएनजी, ५० डिझेल तर १५० इलेक्ट्रीक बसेस खरेदी केल्या जाणार होत्या.

त्यातील २०० सीएनजी व ५० डिझेल अशा २५० बसेस सध्या सुरु आहे. दीडशे पैकी ५० इलेक्ट्रिकल बसेस केंद्र सरकारच्या एन-कॅप योजनेंतर्गत खरेदीचा निर्णय झाला. परंतु बस खरेदीला मुहूर्त लागत नव्हता.

त्यात केंद्र सरकारकडे यापूर्वी नोंद झालेल्या इलेक्ट्रिक बसेसचे करार पूर्ण होत नसल्याने नाशिक महापालिकेला इलेक्ट्रिकल बसेसची नोंदणी झाल्यानंतर दीड ते दोन वर्षांनी बसेस मिळतील अशी स्थिती होती. त्यामुळे एन-कॅप अंतर्गत बसेसचा विषय मागे पडला.

आता पीएम योजनेंतर्गत शंभर इलेक्ट्रिकल बसेसचा प्रस्ताव आला. त्यासाठी चार्जिंग स्टेशन व डेपो उभारण्याची महापालिकेची जबाबदारी आहे.

त्यामुळे शंभर बसेसचे संचलन करणे अवघड होणार असल्याने तसेच वाढता तोटा लक्षात घेऊन पन्नास इलेक्ट्रिकल बसेस केंद्र सरकारकडून मागविल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बसेससाठी चालकांना ७५ रुपये प्रति किलोमीटर भाडे देणे अपेक्षित आहे.

NMC Nashik News
NMC News: पार्किंग समस्येवर महापालिकेकडूनच उतारा! 20 ठिकाणी जागा; रस्त्याच्या कडेला वाहन लावल्यास शुल्क वसुली

यात २२ रुपये प्रतिकिलोमीटर अनुदान केंद्र सरकार देणार आहे. उर्वरित रक्कम महापालिकेला द्यावी लागणार असून त्यातून एका बसेस मागे पंधरा ते वीस हजार रुपये दररोज महापालिकेला द्यावे लागतील.

सल्लागार समितीकडून आढावा

केंद्र सरकार पीएम योजनेतून शंभर बसेस देणार आहे. बसेस देण्यासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली असून नुकत्याच घेण्यात आलेल्या आढाव्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

अस्तित्वातील बस डेपो, व्यवस्थापन पद्धती, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन यासंदर्भात सल्लागार समितीकडून आढावा घेण्यात आला.

NMC Nashik News
Nashik News: डॉक्टरांमध्येही बेरोजगारीचे प्रमाण अधिक! NMCत मानधन नियुक्तीसाठी 342 डॉक्टरांची मुलाखत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.