ABHA Card News : आयुष्मान कार्ड वितरणात नाशिकचा भोपळा; मालेगाव अव्वल

Ayushman Bharat Card
Ayushman Bharat Cardesakal
Updated on

ABHA Card News : नाशिक जिल्ह्यात आयुष्मान कार्डासाठी भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत नाशिक, मालेगाव शहरासह १५ तालुक्यांत अंत्योदयचे तीन लाख ६३ हजार ९७, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे १९ लाख २९ हजार ९३३ लाभार्थी आहेत.

आयुष्मान कार्डसाठी एकूण लाभार्थी संख्या २२ लाख ९३ हजार ३० आहे. आयुष्मान कार्ड तयार करण्यात व वाटप करण्यात जिल्ह्यात मालेगाव तालुका अव्वल क्रमांकावर आहे. नाशिक शहरात एकही आयुष्मान कार्ड तयार झालेले नाही. (No Ayushman card has been prepared in Nashik news)

केंद्र व राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ यासह विविध उपक्रमांतून जास्तीत जास्त आयुष्मान कार्ड वितरण करण्याचा संकल्प केला आहे. हे कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका असलेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी असताना हा तालुकाही शुन्यावर अडकला आहे. इगतपुरीसह नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथेही याबाबत कामकाज झालेले नाही.

मालेगावच्या महसूल विभागाने पुढाकार घेतल्याने आयुष्मान कार्ड वितरणात सर्वाधिक आघाडी घेतली आहे.

Ayushman Bharat Card
Nashik News : बाजार समिती सचिव अरुण काळे बडतर्फ; कर्तव्यात कसूर भोवला

प्रांताधिकारी नितीन सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी गावोगावी भेट देऊन आशा सेविका व स्वस्त धान्य दुकानदार यांना कार्ड तयार करण्यापासून वितरणाबाबत प्रोत्साहित केले. त्याची फलश्रुती तालुका अव्वलस्थानी असण्यात झाली.

मालेगाव तालुक्यात आयुष्मान कार्डसाठी अंत्योदयचे ११ हजार १४८, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे दोन लाख ४८ हजार १०४ लाभार्थी पात्र आहेत. यात अंत्योदयचे एक हजार ७५, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे नऊ हजार १८८ आयुष्मान कार्ड तयार करून या सर्व कार्डांचे वितरण करण्यात आले. याउलट शहरातील स्थिती आहे.

शहरात अंत्योदयचे १६ हजार ५४७, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे ३८ हजार ५९७ लाभार्थी संख्या आहे. यापैकी अंत्योदयचे ३४९ व प्राधान्य कुटुंब योजनेचे ४२५ आयुष्मान कार्ड तयार करून वितरित करण्यात आले आहे. नाशिक शहरात व जिल्ह्यात अंत्योदयचे तीन हजार २२६, तर प्राधान्य कुटुंबचे १३ हजार ६८३ आयुष्मान कार्डांचे वितरण झाले.

Ayushman Bharat Card
Nashik News : गोदाघाटावर सौंदर्याऐवजी बकालपणा; स्मार्ट कामांचा बोजवारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.