निफाड (दि. नाशिक) : पुरवठा विभागात (Supply department) रेशनकार्ड (Ration Card) मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागत असून, चार महिन्यांपासून कोरे रेशनकार्ड नसल्याने अवघ्या जिल्ह्यात पुरवठा विभागावर नाराजी व्यक्त होत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. (no blank ration card from 4 months Food Supply Department Nashik News)
पाच महिन्यांपासून नागरिकांची रेशनकार्ड मिळण्यासाठी धावपळ सुरू आहे. संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांकडे चकरा मारूनही रेशनकार्ड कधी मिळेल, याबाबत विचारणा करीत असले तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून रेशनकार्ड कधी मिळेल, याची शाश्वती मिळत नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे ऑनलाइन रेशनकार्ड प्रणाली सुरु असली तरी यात नव्या त्रुटी आढळत आहेत. तीन महिन्यांपासून ऑनलाइन नोंदणीही बंद असल्याने नव्याने रेशनकार्ड काढलेल्या तसेच नवीन नावनोंदणी झालेल्या नागरिकांना धान्य मिळणे कठीण झाले आहे. पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्यास ऑनलाइन प्रणाली बंद असल्याचे सांगितले जाते.
ऑनलाइन प्रणाली सुरू झाल्यावर लवकरच नावे दाखल करण्याचे आश्वासन संबंधित विभागाकडून मिळत असले तरी ते कधी सुरु होणार, असा सवाल विचारला जात आहे. ऑनलाइन प्रणालीत कुटूंबातील प्रत्येक सदस्याचे आधारकार्ड लिंक केल्यानंतर त्या रेशनकार्डला १२ अंकी नंबर प्राप्त होतो. त्यानंतर उत्पन्नाच्या अटीवर पात्र कुटूंबाना स्वस्त धान्य मिळते. मात्र नवीन वर्षापासून त्या प्रणालीत दोष आढळून येत आहे. दिंडोरी तालुक्याचा विचार केल्यास जवळपास दोन हजार रेशनकार्डचे अर्ज प्रलंबित आहे. पुरवठा विभागाकडे अत्यावश्यक कारणासाठी लागणारे रेशनकार्डही उपलब्ध नाही हे विशेष! एखाद्या व्यक्तीला अत्यावश्यक रेशनकार्ड लागले तर त्यास रेशनकार्ड देण्यासाठी दिंडोरी पुरवठा विभागाकडे कोरे रेशनकार्ड उपलब्ध नाही.
यामुळे संबंधित गरजू लाभार्थी शासकीय योजनेंपासून वंचित राहु शकतो. जिल्हास्तरावरून संबंधित विभागाने एकत्रित मागणी केली असली तरी अजून किती दिवस वाट बघावी लागणार, हा प्रश्नच आहे. नागरिकांचा अंत न बघता संबंधित विभागाने रेशनकार्ड त्वरीत मिळतील, अशी व्यवस्था करावी, त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
"संपूर्ण जिल्ह्यात रेशनकार्डचा तुटवडा असून, संपूर्ण जिल्ह्याने जवळपास ६० हजार रेशनकार्डची मागणी केली आहे. त्याप्रमाणे त्या रेशनकार्डची छपाई लवकरच पूर्ण होऊन तालुक्यालाही मुबलक प्रमाणात रेशनकार्ड प्राप्त होतील. " - पंकज पवार, तहसीलदार, दिंडोरी
"पाच महिन्यांपासून रेशनकार्डसाठी सर्वसामान्य नागरिक चकरा मारत आहेत. परंतु संबंधित विभागाकडून वेळकाढूपणा सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पालकमंत्री छगन भुजबळांनी यात लक्ष घालून जिल्ह्याला रेशनकार्डाचीपूर्तता करुन द्यावी, अशी मी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मागणी करते." - शैला उफाडे, सभापती, बाजार समिती, दिंडोरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.