पंचवटी (जि. नाशिक) : तीर्थक्षेत्र म्हणून अवघ्या जगभरात नाशिकची ओळख ज्या परिसरामुळे आहे, त्या रामतीर्थासह गोदाघाट परिसराला उच्च दर्जाचा तिसऱ्या डोळ्याची अर्थात, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची प्रतिक्षाच आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका आणि पोलिस प्रशासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे. गोदाप्रेमी, स्थानिक व्यावसायिक आणि भाविक, पर्यटकांकडूनदेखील तशी मागणी होत आहे. (no camera setup on godaghat Harmful to safety of tourists Nashik News)
प्रभू श्रीरामचंद्गांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराची अवघ्या जगभरात कुंभनगरी, पुण्यभूमी, तीर्थक्षेत्र म्हणून ओळख आहे. पंचवटीतील गोदाघाट परिसर व तपोवनात अनेक देव- देवतांची मंदिरे आहेत. जवळपास प्रत्येक मंदिराला काही ना काही इतिहास आहे. हे बघण्यासाठी अवघ्या देशभरातूनच नव्हे तर जगातून भाविक व पर्यटक येत असतात.
रामकुंड परिसरात वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी जवळपास ३०० दिवस कुठल्या ना कुठल्या सण उत्सवानिमित्त जनसामान्यांसह भक्त, भाविकांसह पर्यटकांची रीघ असते. अनेक वेळा येणाऱ्या भाविक व पर्यटकांना छोट्या मोठया कटू प्रसंगाना सामोरे जावे लागते. यात सोबत असलेले सामान, बॅग, सोनसाखळी, पाकीट चोरी होणे, पर्स चोरी होणे, तसेच पार्किंग मध्ये पार्क केलेल्या वाहनातून काच फोडून रोख रकमेसह मौल्यवान वस्तू चोरी जाण्याच्या घटनाही नेहमीच घडत असतात.
गोदाघाट परिसरात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मूर्तीदेखील आहेत. या मूर्तींची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लाखो रुपये किंमत आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. तसेच या परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात बोट, चायनीज गाड्या जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि भाविक, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अहिल्याबाई होळकर पुलापासून ते तपोवनपर्यंत उच्चप्रतीचे सीसीटीव्ही बसविणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे येणाऱ्या भक्त भाविकांची लूट, फसवणूक टळून तो निर्धास्तपणे दर्शनाचा लाभ घेऊ शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
"गोदाघाट परिसरात धार्मिक विधी व पर्यटनासाठी मोठ्या संख्येने भाविक भारतभरातून येत असतात. स्थानिकांसह भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची नितांत गरज आहे. गोदाघाट परिसरात जोपर्यंत सीसीटीव्हीचे जाळे तयार होणार नाही, तोपर्यंत श्री रामाची भूमीची सुरक्षा रामभरोसे राहील." -देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती
"दर बारा वर्षांनंतर भरणारा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाडे तत्त्वावर सीसीटीटीव्ही कॅमेरे बसविले जातात, त्यासाठी महापालिका खर्च करते. सदर ठेका संपताच कॅमेरे काढून घेतले जातात. भाडे तत्त्वावर कॅमेरे घेण्याऐवजी थोडी अधिक तरतूद करत महापालिकेने संपूर्ण गोदाघाट परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावे." - नीलम पाटील, सामाजिक कार्यकर्त्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.