Nashik BJP News: भाजप प्रवेश करणाऱ्यांना ‘नो कमिटमेंट’! देवळाली विधानसभेवरून गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ९) अन्य पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
State president Chandrasekhar Bawankule, Bharti Pawar, Seema Hire, Devyani Farande etc. while welcoming Rajshree Ahirrao on joining BJP.
State president Chandrasekhar Bawankule, Bharti Pawar, Seema Hire, Devyani Farande etc. while welcoming Rajshree Ahirrao on joining BJP. esakal
Updated on

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ९) अन्य पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी देखील काही प्रवेश झाले.

त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यासंदर्भात कुठलेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

भाजपमध्ये सध्या जे प्रवेश होत आहे ते इतर पक्षांकडे नेतृत्व नसल्याने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास गॅरंटीच्या आधारे होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. (No Commitment to BJP entrants Explanation of Girish Mahajan from Deolali Vidhan Sabha Nashik political News)

भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात आज शेकडो प्रवेश झाले. त्यात तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेल्या राजश्री अहिरराव, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित सोनाली राजे पवार व काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांच्या प्रवेशाचा समावेश आहे.

अहिरराव यांचा प्रवेश झाल्याने त्या देवळालीसाठी इच्छुक आहे, तर यापूर्वीच माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुश्री घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या राज्यात भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या शिंदे गटाची युती आहे.

या युतीला महायुती असे नाव देण्यात आले आहे. श्रीमती अहिरराव यांना प्रवेश दिल्याने देवळालीची जागा भाजप लढवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना महाजन यांनी नकारात्मक उत्तर दिले.

देवळाली विधानसभेमुळ अन्य विधानसभा मतदारसंघासाठी कुठलीही कमिटमेंट देण्यात आलेली नाही. मुळात जे प्रवेश करत आहे ते उमेदवारीसाठी प्रवेश करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास असल्याने त्यातून हे प्रवेश होत आहे.

या माध्यमातून भाजपदेखील मोठा होत आहे. अहिरराव यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर कुठलेही दडपण आणण्याचे काहीच कारण नाही. महायुतीमध्ये एकजूट असून, जागा वाटपात जो काय निर्णय व्हायचा तो होईल, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.

State president Chandrasekhar Bawankule, Bharti Pawar, Seema Hire, Devyani Farande etc. while welcoming Rajshree Ahirrao on joining BJP.
Jalagon Political News : शेतकरी संस्थेच्या निवडणुकीसाठी अर्जांचा पाऊस ; राजकीय पक्षांमध्ये वातावरण तापले

येत्या काळात विरोधी पक्षांना मोठे खिंडार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाशी लोक जोडले जात आहे. राज्यामध्ये सर्वच पक्षांचे प्रमुख भाजपमध्ये येत आहे. भारतीय जनता पक्षावर विश्वास वाढत चालल्याचा हा परिणाम आहे.

महाविकास आघाडीची दैनिय अवस्था राज्यात झाली आहे. नेतृत्वहीन व दिशाहीन असल्याने या पक्षाचे सर्व लोक भाजपकडे आकर्षित झाले आहे. पुढील काळातही अनेक मोठे पक्षाचे नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

ठाकरे-पवारांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही

उद्धव ठाकरे व शरद पवार हे न्यायव्यवस्थेवर टोकला जाऊन टीका करत आहे. त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार भक्कम आहे. बुधवारी जोकाही निर्णय लागायचा तो लागेल.

तांत्रिकदृष्ट्या बघितल्यास आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. जे आमच्यावर सध्या टीका करत आहे तेदेखील भविष्यात भारतीय जनता पक्षामध्ये येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे सरकारसाठी सकारात्मक निर्णय लागेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कांदा उत्पादकांना विश्वासात घेऊ

जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत आहे. त्यामुळे त्यांची नाराजी आहे, हे मान्य आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडू.

कांद्या संदर्भात आज-उद्यापर्यंत निर्णय होईल. यातून शेतकऱ्यांचे समाधान होईल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. कांदा उत्पादकांनी आज दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले.

State president Chandrasekhar Bawankule, Bharti Pawar, Seema Hire, Devyani Farande etc. while welcoming Rajshree Ahirrao on joining BJP.
Shiv Sena Politics : 'असा' निर्णय घेतल्यास ते 40 आमदार अपात्र ठरतील; निकालापूर्वीच आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.