नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती प्रक्रियेत गैरप्रकार घडल्याचा आरोप झाला होता. ‘म्हाडा’ भरतीतील गुन्हा दाखल उमेदवारांचा ‘आरोग्य’च्या परीक्षेत सहभाग असल्याचाही दावा केला जात होता.
या संदर्भात विद्यापीठातर्फे स्थापन चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. भरती प्रक्रियेत डमी, अथवा बोगस उमेदवार आढळून आलेले नसल्याचा निष्कर्ष समितीने दिलेल्या अहवालात नोंदविला आहे. (no dummy bogus candidate in recruitment process of Arogya Nashik News)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवर शिक्षकेतर पदांकरिता परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान, या प्रक्रियेत भरतीचे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप करण्यात आला होता. विद्यापीठाच्या गैरप्रकाराबाबत प्राप्त हरकतींच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली होती.
हरकत नोंदविणाऱ्या व्यक्तींना चौकशी समितीसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलेली होती. यानंतर नुकताच चौकशी समितीकडून निरीक्षणे प्राप्त झाली असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले आहे.
चौकशी समितीची निरीक्षणे आणि सूचना, निर्णय असे-
- विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत कुठल्याही परीक्षार्थीने परीक्षा कालावधीदरम्यान डमी अथवा बोगस उमेदवार परीक्षेस बसणे किंवा परीक्षेत गैरप्रकाराकरिता कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बापरल्याबाबतची तक्रार केल्याचे आढळून येत नाही.
- विद्यापीठास आरोग्य विज्ञानाच्या विविध अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव असून, परीक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, केंद्र निरीक्षक, अंतर्गत दक्षता पथक व भरारी पथक अशी यंत्रणा नेमली होती. त्यामुळे तक्रारीत नमूद घटना घडणार नाही याची विद्यापीठाने योग्य ती खबरदारी घेतली होती.
- डमी अथवा बोगस उमेदवार परीक्षेस बसणे, परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होणे याबाबतच्या तक्रारी या टप्प्यावर ठोस पुराव्यांअभावी सिद्ध होत नाहीत.
- निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करताना संबंधित नियुक्ती आदेश त्यांच्या विरुद्ध कुठल्याही पोलिस ठाण्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा व विशेषतः कुठल्याही परीक्षेत गैरकृत्य केल्याबाबतचा गुन्हा नोंद नसल्याचे किंवा प्रलंबित नसल्याचे हमीपत्र देण्याच्या अधीन राहून नियुक्ती आदेश निर्गमित करावे.
- हमीपत्रातील माहिती कुठल्याही स्तरावर खोटी असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करून सेवा खंडित करण्याचा विद्यापीठास अधिकार असेल.
- याबाबतची अट नियुक्ती पत्रात नमूद करण्यात यावी. तसेच, नियुक्ती आदेशानुसार संबंधित पदावर रुजू होताना पोलिस यंत्रणेमार्फत दिला जाणारा चारित्र पडताळणीचा दाखला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.