Nashik Traffic News : ‘वाहतूक सुरक्षा सप्ताहा’ची उदासीनता; ना प्रबोधन, ना जनजागृती

देशभरात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाहतूक सुरक्षा सप्ताह पाळला जातो.
No enlightenment and no public awareness by traffic police in city nashik traffic
No enlightenment and no public awareness by traffic police in city nashik traffic esakal
Updated on

Nashik Traffic News : देशभरात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाहतूक सुरक्षा सप्ताह पाळला जातो. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिस शाखांकडून प्रबोधनात्मक व जनजागृतीपर उपक्रम सप्ताहात राबविणे अपेक्षित असते.

परंतु, शहर व ग्रामीण पोलिस दलाला या वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा विसरच पडला की काय असे दिसते आहे. (No enlightenment and no public awareness by traffic police in city nashik traffic news)

विनाहेल्मेट, ट्रीपल सीट आणि सिग्नल जम्पिंग करणारे वाहनचालक सुसाट धावत आहेत, तर दुसरीकडे ज्यांच्यावर सप्ताहामध्ये जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याची जबाबदारी असताना ते न राबविणाऱ्या वाहतूक शाखेचीच उदासीनताच यातून समोर आली आहे. दिवसेंदिवस वाढते अपघात, अपघाती मृत्यू चिंतेचा विषय आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत.

तर, गेल्या ३१ वर्षांपासून केंद्राच्या सुरक्षा परिषदेकडून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देशभर वाहतूक सुरक्षा सप्ताह पाळला जातो. तसेच निर्देशही संबंधित विभागाकडून राज्यातील राज्य महामार्ग विभाग, पोलिस आयुक्तालय, ग्रामीण अधीक्षकांच्या वाहतूक शाखांना देण्यात येतात. त्यानुसार, देशभरात वाहतूक शाखांच्या माध्यमातून जनजागृतीपर व प्रबोधनात्मक उपक्रम व उपाययोजना केल्या जातात.

No enlightenment and no public awareness by traffic police in city nashik traffic
Nashik Traffic News : रविवारी रात्री शहरातील वाहतुकीचा ‘चक्काजाम’!

परंतु, याबाबत नाशिक शहर वाहतूक शाखा आणि नाशिक ग्रामीण वाहतूक शाखांची उदासीनताच दिसून आली आहे. एकीकडे वाहतूक सप्ताह सुरू असताना दुसरीकडे मात्र, विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, सिग्नल जम्पिंगसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक बिनधास्त सुसाटपणे धावत आहेत.

शहरातील कोणत्याही रस्त्यांवर वाहतूक शाखांकडून प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे वाहनचालकांच्या निदर्शनास आलेले नाही. तर, सिग्नलवरील पुसट झालेले झेब्रा पट्टेही नव्याने आखण्यात आलेले नाहीत. यातून शहर व ग्रामीण वाहतूक शाखांची उदासीनताच अधोरेखित होते आहे.

उपक्रमांचाच विसर

रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत यापूर्वी वाहतूक पोलिस शाखांकडून विभागनिहाय प्रबोधनात्मक व जनजागृतीपर उपक्रम राबविले जात. शाळा-महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात परिसंवाद, वक्तृत्व , निबंध स्पर्धा घेण्यात येतात. याशिवाय, प्रत्यक्ष वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांचे प्रबोधन केले जात. तसेच, रिक्षाचालक, ट्रकचालक, बेशिस्त दुचाकी, चारचाकी चालकांसाठीही उपक्रम राबवून वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केले जाते.

गतवर्ष चिंताजनक

राज्यात रस्ता अपघातांमध्ये नाशिक अग्रस्थानी आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबरअखेर नाशिक शहरात ४२६ अपघात झाले होते. यात त्यापैकी ३३९ दुचाकी वाहन चालकांचा अपघात झाला होता. तर, १०६ दुचाकीस्वारांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. २६९ दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. त्यातही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे प्रमाण लक्षणीय आहे.

No enlightenment and no public awareness by traffic police in city nashik traffic
Nashik Traffic News : ट्रॅफिक जामचा तिढा काही सुटेना; सायंकाळी 2 तास लागतात वाहनांच्या रांगाच रांगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()